नौका सर्व्हे प्रक्रिया पूर्ण करा ः मोंडकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नौका सर्व्हे प्रक्रिया पूर्ण करा ः मोंडकर
नौका सर्व्हे प्रक्रिया पूर्ण करा ः मोंडकर

नौका सर्व्हे प्रक्रिया पूर्ण करा ः मोंडकर

sakal_logo
By

नौका सर्व्हे प्रक्रिया
पूर्ण करा ः मोंडकर

जलक्रीडा व्यावसायिकांना आवाहन

मालवण, ता. १३ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जलक्रीडा व्यावसायिकांनी व्यवसाय अधिकृत करण्यासाठी नौका सर्व्हे प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष विष्णू ऊर्फ बाबा मोंडकर यांनी केले आहे.
जिल्ह्यातील जलक्रीडा व्यावसायिकांना संघटित करून जलक्रीडा व्यवसायात सुसूत्रता येण्यासाठी महासंघाचे प्रयत्न सुरू आहेत. जलक्रीडा व्यवसाय करण्यास परवानगी मिळण्यासाठी पर्यटन संचालनालय नवी मुंबई यांच्याकडे परवानगीसाठी ज्या व्यावसायिकांनी प्रस्ताव सादर केले आहेत, त्यांच्यासाठी महासंघामार्फत प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक महत्त्वपूर्ण प्रक्रियेचा भाग नौका सर्व्हे प्रक्रिया आहे. जिल्ह्यातील जे जलक्रीडा व्यावसायिक प्रवासी व नौका विहार, स्कुबा डायव्हिंग, पॅरॅसिलींग, वॉटरस्पोर्ट्स व्यवसायाच्या माध्यमातून पर्यटकांसाठी सेवा देतात, अशा व्यावसायिकांना महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या माध्यमातून होणाऱ्या नौका सर्व्हे प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे. गेल्या सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ शासकीय फी जमा करून देखील नौका सर्व्हेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात अधिकारी उपलब्ध होत नसल्यामुळे जलक्रीडा व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. यासंबंधी पर्यटन व्यावसायिक महासंघातर्फे प्रयत्न सुरू होते. या पाठपुराव्यास महासंघास यश प्राप्त झाले असून महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या वतीने १४ व १५ ला जिल्ह्यातील अधिकारी उपस्थित राहून नौका सर्व्हे प्रकिया पूर्ण करणार आहे. तरी जलक्रीडा व्यवसाय अधिकृत करण्यासाठी ही प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन मोंडकर यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y95721 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..