असलदे वृद्धाश्रमास रोटरी क्लबतर्फे खुर्ची | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

असलदे वृद्धाश्रमास
रोटरी क्लबतर्फे खुर्ची
असलदे वृद्धाश्रमास रोटरी क्लबतर्फे खुर्ची

असलदे वृद्धाश्रमास रोटरी क्लबतर्फे खुर्ची

sakal_logo
By

49899
असलदे ः वृद्धाश्रमाला चाकाची खुर्ची प्रदान करताना रोटरी क्लब ऑफ मँगोसिटीचे पदाधिकारी.

असलदे वृद्धाश्रमास
रोटरी क्लबतर्फे खुर्ची
देवगड ः येथील रोटरी क्लब ऑफ मँगोसिटीच्यावतीने असलदे (ता. कणकवली) येथील दिविजा वृद्धाश्रमाला चाकाची खुर्ची प्रदान करण्यात आली. या वस्तुरुपी देणगीबद्दल वृद्धाश्रम संस्था संचालकांनी समाधान व्यक्त केले. असलदे वृध्दाश्रमाला रोटरी क्लब अध्यक्ष श्रीपाद पारकर, खजिनदार गौरव पारकर, दयानंद पाटील, विजय बांदिवडेकर, अनिल गांधी यांनी भेट दिली. वृध्दाश्रमाची गरज ओळखून रोटरी क्लबच्यावतीने त्यांना चाकाची खुर्ची भेट दिली.
.............
देवगडमध्ये ‘अंगारकी’चा उत्साह
देवगड ः अंगारकी संकष्टीनिमित्त तालुक्यातील विविध ठिकाणच्या गणेश मंदिरात आज भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. बऱ्याच महिन्यांनी संकष्टीला अंगारक योग आल्याने भाविकांमध्ये उत्साह दिसत होता. सकाळपासूनच येथील किल्ला गणेश मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. पाऊस नसल्याने अनेकांच्या दृष्टीने सोयीचे झाले होते. दुपारीही भाविकांची गर्दी होती. भाविकांची सतत ये-जा सुरू होती. दुपारी उद्योगपती नंदकुमार घाटे यांच्या हस्ते मंदिरात आरती झाली. येथील गणेश उद्यान मंदिरातही दर्शनासाठी भाविक येत होते. तालुक्यातील दाभोळे पोखरबांव, तळेबाजार तसेच वाडा सडेवाडी भागातील गणेश मंदिरांतही दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. काहीजण दर महिन्याला येणाऱ्या संकष्टीनिमित्त उपवास करीत नसले तरी अंगारकी दिवशी उपवास करतात. त्यामुळे दर्शनासाठी मंदिरात गर्दी झाली होती.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y95722 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..