कोंडवाड्यातील जनावरे दावी तोडून पसार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोंडवाड्यातील जनावरे दावी तोडून पसार
कोंडवाड्यातील जनावरे दावी तोडून पसार

कोंडवाड्यातील जनावरे दावी तोडून पसार

sakal_logo
By

swt1318.jpg
49900
दोडामार्गः येथील स्मशाभूमीशेजारील जागेतील कोंडवाडा आणि सहा मोकाट गुरे.

कोंडवाड्यातील जनावरे दावे तोडून पसार
दोडामार्गात मोहीम सुरुचः प्रशासनाच्या सहकार्याची गरज
सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. १३ ः येथील बाजारपेठेतील मोकाट गुरांचा प्रश्न तडीस नेण्यासाठी नगराध्यक्ष चेतन चव्हाण तळमळीने प्रयत्न करीत असले, तरी त्यांना प्रशासनाचे आवश्यक सहकार्य मिळत नसल्याचे चित्र आहे. श्री. चव्हाण यांनी सोमवारपासून (ता. १२) मोकाट गुरांना कोंडवाड्याचा रस्ता दाखवायला सुरवात केली आहे. पहिल्याच दिवशी त्यांनी सोळा मोकाट गुरांना कोंडवाड्यात डांबले खरे; पण त्यातील दहा गुरे दावी तोडून पसार झाली. सध्या केवळ सहाच गुरे कोंडवाड्यात आहेत. नगराध्यक्ष चव्हाण यांनी उचललेले पाऊल धाडसी आणि जनहिताचे असल्याने प्रशासनाने त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याची गरज आहे.
मोकाट गुरांचा प्रश्न कसई दोडामार्ग ग्रामपंचायत अस्तित्वात असल्यापासून आहे. गेल्या साडेपाच सहा वर्षापासून ग्रामपंचायतीच्या जागी नगरपंचायत स्थापित झाली. त्यावेळीही उपनगराध्यक्ष असलेल्या चव्हाण यांनी पुढाकार घेत मोकाट गुरे घोटगे येथील एका व्यक्तीला सांभाळण्यासाठी देवून त्यांच्यापासून लोकांना होणारा त्रास कमी करण्याचा प्रयत्न केला होता. तथापि, काही स्थानिक मंडळींनी गुरे तिकडे नेण्यास विरोध केला. संबंधित व्यक्तीवर हात उचलण्यापर्यत त्यांची मजल गेली होती. दरम्यानच्या काळात स्थानिक युवक अभिजीत खांबल यांनी मोकाट जनावरांच्या बंदोबस्तासाठी न्यायालयात दावाही दाखल केला होता. त्यांनतर श्री. चव्हाण नगराध्यक्षपदी स्थानापन्न झाले आणि त्यांनी मोकाट गुरांचा प्रश्न तडीस लावण्याचा प्रयत्न सुरु केले. गुरांसाठी रखवालदार शोधणे, गुरांना कोंडवाड्यात नेणे त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करणे या सगळ्या पातळीवर त्यांनी पुढाकार घेतला; मात्र त्या सगळ्या प्रक्रियेत त्यांना नगरपंचायत प्रशासनाची हवी तशी मदत मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
------------
चौकट
पाठलाग आणि झुंजीने नागरिक भयभीत
बाजारपेठेतील भाजीपाला, प्लास्टिक वैगरे खाऊन मोकाट जनावरे मस्तवाल झाली आहेत. त्यातील वळू तर भर रस्त्यात गर्दीच्या ठिकाणीही झुंजत असतात. शिवाय काही वळू बाजारपेठेतील ग्राहकांच्या पिशवीतील सामानावर डल्ला मारण्यासाठी पाठलाग आणि हल्लाही करतात. अशा घटना नागरिकांना भयभीत करत असायच्या. त्या आता कमी होण्याची आशा करायला हरकत नाही.
------------
कारवाईच्या भीतीने मालक अलर्ट
नगराध्यक्ष चव्हाण यांनी मोकाट गुरांच्या मालकावर कारवाई करण्याचे जाहीर केल्याने अनेक मालक अलर्ट झाले. त्यातील काहींनी आपली गुरे गुपचूप घरी नेली. त्यामुळे आता रस्त्यावरील मोकाट गुरांची संख्या कमी झाल्याचे दिसते. कारवाई शिथील झाल्यास पुन्हा मोकाट गुरांचा उपद्रव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
-------------
कोट
"तालुक्यातून दोडामार्गमध्ये येणाऱ्या सर्वांना बाजारपेठेत निर्धास्तपणे फिरता यावे म्हणून मोकाट गुरांना कोंडवाड्यात टाकण्याची मोहीम सुरु केली. त्याला नगरपंचायत प्रशासनाच्या साथीची गरज होती; पण त्यांची हवी तशी साथ आपल्याला मिळत नाही. असे असले तरी मोकाट गुरांचा प्रश्न संपेपर्यंत आपली मोहीम कायमस्वरूपी सुरूच राहील."
- चेतन चव्हाण, नगराध्यक्ष, दोडामार्ग
------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y95724 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..