चिपळूण - चिपळूण शहराच्या अर्ध्या भागाला कमी दाबाने पाणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण - चिपळूण शहराच्या अर्ध्या भागाला कमी दाबाने पाणी
चिपळूण - चिपळूण शहराच्या अर्ध्या भागाला कमी दाबाने पाणी

चिपळूण - चिपळूण शहराच्या अर्ध्या भागाला कमी दाबाने पाणी

sakal_logo
By

---
अर्ध्या चिपळूण शहराला कमी दाबाने पाणी
--
प्रश्न सोडवण्यास ७ दिवसांची मुदत ; मुख्याधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे आंदोलनाचा इशारा
चिपळूण, ता. १३ ः गेल्या दोन महिन्यांपासून शहरातील गोवळकोट, पेठमाप, उक्ताड, मुरादपूर, गोवळकोट रोड, बाजारपेठ या भागात अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने सततच्या पाणी समस्येमुळे येथील नागरिक हैराण झाले आहेत. हा प्रश्न येत्या ७ दिवसात न सोडवल्यास आंदोलनात्मक भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा माजी नगरसेवक इनायत मुकादम यांनी मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.
त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, २ महिन्यापासून गोवळकोट येथील जॅकवेलमधून अपुरा व अनियमित पाणीपुरवठा होत आहे. यामुळे शहरवासियांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. वास्तविक पाणी ही अत्यावश्यक बाब असल्याने पालिकेने तातडीने उपाययोजना करून नागरिकांना नियमित व पुरेसा पाणीपुरवठा होणे आवश्यक आहे. नागरिकांना होणाऱ्या त्रासाबाबत पालिका प्रशासनाला जाणीव करून द्यावी लागते हीच शहरवासीयांची खरी शोकांतिका आहे. पाणीसमस्येबाबत पालिकेकडे विचारणा केली तर नदीलाच पाणी नाही तर आमचा काय इलाज आहे, असे कारण सांगितले जाते.
खरी वस्तुस्थिती वेगळीच आहे. नदीला पाणी भरपूर आहे; पण पाण्याला अडथळा निर्माण झाल्याने नदीपात्राचे दुसऱ्या तिरावरून वाहणारे पाणी पालिकेच्या जॅकवेलपर्यंत पोहचत नाही. जॅकवेलचे अवतीभोवतीच्या परिसरात वाळूमिश्रित खडीचे ढिगारे तयार झाल्याने पाण्याला अडथळा निर्माण झाला आहे. ही बाब पालिकेला माहिती असूनही त्यावर उपाययोजना केली जात नाही. परिणामी या जॅकवेलमधून पाणीपुरवठा होत असलेल्या गोवळकोट, पेठमाप, मुरादपूर, उक्ताड, बाजारपेठ आदी भागातील नागरिकांना अपूरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने पाण्याच्या समस्यांना सामोरे जावे लागते. पोकलँड (जेसीबी) मशीनच्या साहाय्याने जॅकवेलजवळ साचलेला गाळ व खडीचे ढिगारे काढण्यात आले तरच अडथळा दूर होऊन नदीच्या दुसऱ्या तिरावरून (किनाऱ्यालगत) वेगाने वाहणारे पाणी जॅकवेलपर्यंत येऊ शकते.

चौकट
प्रशासनाला याची जाणीव कधी होणार ?
हे काम करण्यास सोयीसुविधांकरिता गंभीर नसलेल्या किंवा सेवेची मानसिकताच नसलेल्या प्रशासनाला याची जाणीव कधी होणार ? हाच खरा प्रश्न आहे. तरी वस्तुस्थितीचा गांभीर्याने विचार करून पुढील ७ दिवसांत तातडीने उपयायोजना करण्यात यावी. याबाबत दिरंगाई व विलंब झाल्यास शहरवासियांना संघटित होऊन आंदोलनात्मक भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा निवेदनाद्वारे मुकादम यांनी दिला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y95764 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..