संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त
संक्षिप्त

संक्षिप्त

sakal_logo
By

अनुकंपा नोकरीसाठी
तात्पुरती प्रतीक्षा यादी
रत्नागिरी ः जिल्हा परिषद, रत्नागिरीअंतर्गत ३१ जुलै अखेर अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळण्यासाठी प्राप्त झालेल्या परिपूर्ण, अपूर्ण व अपात्र अर्जांची तात्पुरती प्रतीक्षा यादी जिल्हा परिषदेच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात आली असून जिल्हा परिषद कार्यालयाचे www.zpratnagiri.org व जिल्हाधिकारी कार्यालयाचे www.ratnagiri.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे. या यादीमधील अनुकंपा उमेदवारांची माहितीची खातरजमा करून त्यामध्ये काही हरकती असल्यास २६ सप्टेंबर पर्यंत सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद रत्नागिरी येथे योग्य त्या पुरावा पृष्ठयर्थ कागदपत्रांसह सादर कराव्यात. त्यानंतर प्राप्त हरकतींचा विचार केला जाणार नाही, असे उपमुख्य कार्यकारी अधिकारीजिल्हा परिषद रत्नागिरी यांनी कळवले आहे.

लांजातील महिला अद्याप बेपत्ता
रत्नागिरी ः उज्ज्वला शाम गजबार (वय २४, रा. गवाणे मोहल्ला ता. लांजा, जि. रत्नागिरी) या गवाणे मोहल्ला ता. लांजा जि. रत्नागिरी येथून ९ जून २०१७ पासून बेपत्ता आहेत. त्यांची उंची पाच फूट, रंग सावळा, चेहरा उभट, बांधा मध्यम, केस काळे लांब, डोळे घारे, नेसणीस हिरव्या रंगाची सहावारी साडी व हिरव्या रंगाचा ब्लाऊज, गळ्यात काळे मणी असलेले मंगळसूत्र, कानात कुडी, पायात चप्पल आहे. सदर व्यक्ती आढळून आल्यास पोलिस निरीक्षक, लांजा पोलिस ठाणे येथे संपर्क साधावा.


भैरागड येथे अग्निवीर सैन्यभरती
रत्नागिरी ः ई. एम. ई. सेंटर भैरागड भोपाळ, येथे १९ सप्टेंबर पासून हेडक्वॉर्टरस युनिट कोटामधून अग्निवीर सैन्यभरती आहे. भरतीमध्ये युद्ध विधवा/माजी सैनिक/माजी सैनिक विधवा पत्नी यांच्या पाल्यांकरिता तसेच सेवारत सैनिक यांच्या पाल्यांकरिता सैन्यभरती आयोजित करण्यात आली आहे. १९ सप्टेंबर ला सकाळी ४ वाजता अग्निवीर जी. डी., २२ सप्टेंबरला सकाळी ४ वा. अग्निवीर टेक्निकल, २४ सप्टेंबरला सकाळी ४ वा. अग्निवीर ट्रेडसमनसाठी भरती होणार आहे. तरी इच्छुकांनीआवश्यक कागदपत्रांसहित उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, रत्नागिरी यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळास भेट द्यावी.

खाडीतील रेती उत्खनन
परवान्यासाठी अर्जाचे आवाहन
रत्नागिरी ः रत्नागिरी जिल्ह्यातील सन २०२२-२०२३ (९/०६/२०२३) या कालावधीचे महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड मुंबई यांच्या जलसर्व्हेक्षण अहवालानुसार जोग नदी/आंजर्ला खाड़ी, वाशिष्टी नदी/ दाभोळ खाडी, शास्त्री नदी/जयगड खाडी व काळबादेवी खाडीपात्रातील हातपाटी व डुबीद्वारे पारंपरिक पद्धतीने वाळू/रेती उत्खननासाठी विनालिलाव परवान्यासाठी राखीव असलेल्या रेती गटातील रेती उत्खननासाठी पारंपरिक पद्धतीने डुबी/हातपाटीद्वारे वाळू/रेती उत्खननाचा व्यवसाय करणाऱ्या स्थानिक व्यक्ती/संस्थाकडून या द्वारे अर्ज मागवण्यात येत आहेत. हातपाटी/डुबी रेतीगटाचा सविस्तर तपशील उपविभागीय अधिकारी/तहसीलदार कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर व खनिकर्म कार्यालयाच्या https://ratnagiri.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तरी इच्छुकांनी ३१ मे २०२३ पर्यंत अर्ज करावेत. तसेच परवान्याची मुदत ९ जून २०२३ पर्यंतच वैध राहील, असे अप्पर जिल्हाधिकारी रत्नागिरी यांनी कळवले आहे.

डाक अदालत २७ सप्टेंबरला
रत्नागिरी ः अधीक्षक डाकघर, विभागीय कार्यालय, रत्नागिरीद्वारे २७ सप्टेंबरला सकाळी ११ वा. अधीक्षक डाकघर, विभागीय कार्यालय, गोगटे-जोगळेकर कॉलेजशेजारी, रत्नागिरी येथे डाक अदालत आयोजित केली आहे. एका व्यक्तीने एकच तक्रारअर्ज करावा, तक्रारीचा उल्लेख सर्व तपशीलासह केलेला असावा. डाकसेवेबाबतची आपली तक्रार अधीक्षक डाकघर, विभागीय कार्यालय, रत्नागिरी यांच्या नावे २३ सप्टेंबरपर्यंत अथवा तत्पूर्वी पोहोचेल, अशा बेताने पाठवावी. तद्नंतर आलेल्या तक्रारींचा विचार केला जाणार नाही, असे डाकघर अधीक्षक रत्नागिरी विभाग, रत्नागिरी यांनी कळवले आहे.
------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y95780 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..