राजापूर ः रिफायनरी समर्थकांची राजापूर पोलीस ठाण्यात धडक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर ः रिफायनरी समर्थकांची राजापूर पोलीस ठाण्यात धडक
राजापूर ः रिफायनरी समर्थकांची राजापूर पोलीस ठाण्यात धडक

राजापूर ः रिफायनरी समर्थकांची राजापूर पोलीस ठाण्यात धडक

sakal_logo
By

rat१३p३४.jpg ः राजापूर ः राजापूर पोलिस ठाण्याच्या परिसरामध्ये एकजुटीचा एल्गार करताना रिफायनरी प्रकल्प समर्थक.

समर्थकांची राजापूर पोलीस ठाण्यात धडक

रिफायनरी प्रकल्प झालाच पाहिजेच्या घोषणा; सामंतविरोधी वक्तव्याचा निषेध
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १३ ः राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या विरोधात केलेल्या प्रक्षोभक वक्तव्यानंतर काल दिवसभर तणावाचे वातावरण राहिले होते. प्रकल्प विरोधकांनी पोलिस स्टेशनच्या आवारामध्ये काल गर्दी केल्यानंतर मंगळवारी प्रकल्प समर्थकांनी धोपेश्वर-बारसू परिसरात होऊ घातलेल्या रिफायनरी प्रकल्पावरून उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याविरोधात प्रक्षोभक वक्तव्य करणाऱ्यांना अटक करावी, अशी मागणी करत पोलिस ठाण्याला धडक दिली. या वेळी प्रकल्प समर्थकांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करताना रिफायनरी प्रकल्प झालाच पाहिजे, अशा जोरदार घोषणा दिल्या. प्रकल्पावरून आमच्या नेत्यांवर केलेली टीकाटिप्पणी अन् त्यांची बदनामी खपवून घेतली जाणार नसल्याचा इशाराही देण्यात आला.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीमध्ये गोवळ येथे झालेल्या प्रकल्पविरोधी सभेमध्ये राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या विरोधात प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी नरेंद्र जोशी, सत्यजित चव्हाण व नितीन जठार यांच्या विरोधात माजी नगरसेवक सौरभ खडपे यांनी राजापूर पोलिसात काल तक्रार दाखल केली. त्यानंतर, पोलिस ठाण्याच्या परिसरामध्ये गोवळ परिसरातील महिलांसह ग्रामस्थांनी चांगलीच गर्दी केली होती.
मंगळवारी भाजपा, शिवसेना शिंदे गट आणि शेकडो रिफायनरी प्रकल्प समर्थकांनी राजापूर पोलिस ठाण्याला धडक देत उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याविरोधात प्रक्षोभक वक्तव्य करणारे नरेंद्र जोशी यांच्यासह सत्यजित चव्हाण, नितीन जठार यांना अटक करावी, अशी मागणी केली.
या वेळी भाजपा तालुकाध्यक्ष अभिजित गुरव, नंदू चव्हाण, हनिफ काझी, सौरभ खडपे, डॉ. सुनील राणे, अशफाक हाजू, पंढरीनाथ आंबेरकर, अविनाश महाजन, राजा काजवे, विनायक कदम, दीपक बेंद्रे, रवीकांत रूमडे, विद्याधर राणे, अरविंद लांजेकर, अमर वारिशे, राजा खानविलकर, नरेंद्र कोंबेकर, विजय हिवाळकर, उल्हास खडपे, संकेत खडपे, सुशांत मराठे आदी शेकडो प्रकल्प समर्थक उपस्थित होते.

चौकट
महिलांची ढाल करणे अयोग्य
प्रकल्प काय आहे हे समजून न घेता रिफायनरी प्रकल्प परिसरातील महिलांची ढाल करून त्यांची माथी भडकवण्याचे काम काही एनजीओ व अन्य मंडळी करत असतील तर त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल. प्रकल्पावरून आमच्या नेत्यांवर केलेली टीकाटिप्पणी त्यांची बदनामी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा या वेळी रिफायनरी प्रकल्प समर्थकांनी दिला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y95811 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..