देशातील आठ ग्रामपंचायतींत बापर्डे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देशातील आठ ग्रामपंचायतींत बापर्डे
देशातील आठ ग्रामपंचायतींत बापर्डे

देशातील आठ ग्रामपंचायतींत बापर्डे

sakal_logo
By

49970
बापर्डे ग्रामपंचायत

देशातील आठ ग्रामपंचायतींत बापर्डे

स्वच्छता अभियानात डंका; पाच मिनिटांच्या व्हिडीओत झळकणार गाव

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १३ ः महाराष्ट्र शासनाच्या संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानामध्ये कोकण विभागस्तरावर प्रथम क्रमांक मिळवून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या जिल्ह्यातील बापर्डे (ता.देवगड) ग्रामपंचायतीची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील ‘स्वच्छ ग्रामपंचायत’ अंतर्गत केंद्रीय समितीने निवड केलेल्या देशातील आठ ग्रामपंचायतींमध्ये महाराष्ट्रातून निवड झाली आहे. केंद्राच्या निवड समितीने या ग्रामपंचायतीच्या कामाचे सर्वेक्षण करून प्रमुख बाबींचे चित्रीकरण केले आहे. आठ ग्रामपंचायतींच्या पाच मिनिटांच्या व्हिडीओ चित्रीकरणात बापर्डे ग्रामपंचायत झळकणार आहे.
बापर्डे ग्रामपंचायतीने संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात यावर्षी जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक पटकावला होता. तर विभागस्तरावरील ती पहिल्या क्रमांकाची मानकरी ठरली. सध्या ही ग्रामपंचायत राज्यस्तरीय स्पर्धेत कोकण विभागाचे प्रतिनिधित्व करीत आहे. यापूर्वी ग्रामपंचायतीने स्मार्ट ग्राम योजनेंतर्गत ४० लाखाचे बक्षीस पटकावले होते. तसेच जिह्यातील पहिली ‘आयएसओ’ आणि पहिली ‘पेपरलेस’ ग्रामपंचायत होण्याचा बहुमानही पटकावला होता. स्वच्छतेतील या कार्याची दखल केंद्रीय समितीने घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील स्वच्छ ग्रामपंचायतींचा आदर्श नमुना देशवासीयांसमोर ठेवण्यासाठी आठ राज्यातील आठ उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायतींची निवड करून त्याचे एकत्रित पाच मिनिटांचे चित्रीकरण बनविण्यासाठी एका संस्थेची नियुक्ती केली आहे. या केंद्रीय समितीने महाराष्ट्रातून सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील देवगड तालुक्यातील बापर्डे ग्रामपंचायतीची निवड केली आहे. चित्रीकरणासाठी आणि सर्वेक्षणासाठी निघालेल्या या समितीने अन्य सात राज्यातील सात ग्रामपंचायतींच्या चित्रीकरणानंतर बापर्डे ग्रामपंचायतीला भेट देत येथील महत्त्वाच्या बाबींचे चित्रीकरण केले.
.............
चौकट
देशपातळीवर कामाची दखल
आठही ग्रामपंचायतींचे चित्रीकरण एकत्र करून सुमारे पाच मिनिटांचा स्पेशल व्हिडीओ तयार केला जाणार आहे. हा व्हिडीओ संपूर्ण देशवासीयांसाठी मॉडेल ठरणार आहे. बापर्डे ग्रामपंचायतीच्या कामाची दखल घेऊन देशात वेगळी ओळख मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त होत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y95833 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..