ओसरगावात ४९ लाखांची दारू जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ओसरगावात ४९ लाखांची दारू जप्त
ओसरगावात ४९ लाखांची दारू जप्त

ओसरगावात ४९ लाखांची दारू जप्त

sakal_logo
By

L49984
ओसरगाव ः येथे महामार्गावर जप्त केलेली गोवा बनावटीची दारू आणि कंटेनरसह संशयिताला ताब्यात घेताना भरारी पथक.

ओसरगावात ४९ लाखांची दारू जप्त
उत्पादन शुल्कची कारवाई; कंटेनरमधून मुंबईकडे वाहतूक
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. १३ ः गोव्याहून मुंबईच्या दिशेने होणाऱ्या अवैध दारू वाहतुकीवर आज कणकवली राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने मोठी कारवाई केली. यात तब्बल ४८ लाख ५१ हजार ४८० रुपयांची दारू जप्त केली. ही कारवाई दुपारी दोनच्या सुमारास ओसरगाव पोस्टासमोर करण्यात आली. या प्रकरणी चालक विक्रांत विवेक मलबारी (वय ३३, रा. ओरोस, ख्रिश्चनवाडी, ता. कुडाळ) याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडून दारू वाहतुकीसाठी वापरलेला कंटेनर, दारू व मोबाईल असा एकूण ५५ लाख ११ हजार ४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी ः महामार्गावरून दारू वाहतूक होणार असल्याची माहिती कणकवली पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांना मिळाली होती. उत्पादन शुल्क विभागाचे जिल्हा अधीक्षक डॉ. बी. एच. तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवली विभागाचे निरीक्षक प्रभात सावंत, दुय्यम निरीक्षक संतोष पाटील, जमदाजी मानेमोड, जवान शिवशंकर मुपडे, रणजित शिंदे, स्नेहल कुवेसकर, मदतनीस गोट्या सुर्वे, सला खान यांच्यासह भरारी पथकाने आज महामार्गावर सापळा रचला होता. महामार्गावरील ओसरगाव पोस्ट बस थांब्याजवळ मुंबईच्या दिशेने जाणारा कंटेनर (एमएच २४ जे ७७४०) तपासणीसाठी थांबवण्यात आला. पथकाने कागदपत्रांची मागणी केली असता चालकाने नसल्याचे सांगितले. कंटेनरच्या मागील दरवाजाचे सील तोडून तपासणी केली असता त्यात गोवा बनावटीचे ७५० मिलिलिटरचे ११० बॉक्स, विदेशी दारू बनवण्यासाठीचे १८० मिलीचे ३४० बॉक्स, बिअरचे पाचशे मिलीचे ६३ बॉक्स असे एकूण ५१३ बॉक्स आढळून आले. याची किंमत ४८ लाख ५१ हजार ४८० रुपये आहे. कंटेनर ६ लाख ५० हजार व महागडा मोबाईल असा एकूण ५५ लाख ११ हजार ४८० रपयांचा मुद्देमाल जप्त केला. संशयिताला सायंकाळी येथील न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे उत्पादन शुल्कचे निरीक्षक प्रभात सावंत यांनी सांगितले. उत्पादन शुल्कचे दुय्यम निरीक्षक संतोष पाटील तपास करीत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y95865 Txt Sindhudurg1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..