माणगाव खोऱ्यात जनजीवन विस्कळीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माणगाव खोऱ्यात जनजीवन विस्कळीत
माणगाव खोऱ्यात जनजीवन विस्कळीत

माणगाव खोऱ्यात जनजीवन विस्कळीत

sakal_logo
By

माणगाव खोऱ्यात जनजीवन विस्कळीत
माणगाव, ता. १३ ः शनिवारपासून सुरू झालेल्या अतिवृष्टीमुळे कुडाळ तालुक्यातील उपवडे पूल तीन दिवस पाण्याखाली असल्याने सावंतवाडी-उपवडे एसटी बस उपवडे येथे अडकली आहे. वसोली-खालचीवाडी येथील दशरथ परब यांची गाभण म्हैस पुराच्या पाण्यात वाहून गेली. दुकानवाड भागासह वसोली, वीरवाडी पुलावर भगदाड पडल्याने शिवापूरकडील वाहतूक बंद होती. त्यामुळे माणगावकडे येणार्‍या शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय झाली. माणगाव खोर्‍यात पावसामुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. गणेशोत्सव व महालयासाठी गावी आलेल्या चाकरमान्यांचेही हाल झाले आहेत. परब यांची गाभण म्हैस पुराच्या पाण्यात वाहून मृत्यूमुखी पडली. ७० हजार रुपये किंमतीची ही म्हैस होती. तलाठी एस. पी. मालवणकर यांनी पंचनामा केला. तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश कानगुले यांनी विच्छेदन केले. कृषी सहाय्यक विजय सावंत, वसोली ग्रामसेवक भाग्यश्री सावंत उपस्थित होत्या. आंजिवडे, वसोली, उपवडे, साकिर्डे, शिवापूर भागातील शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे.
--------
चाकरमान्यांसाठी एसटीच्या ३०० गाड्या
कणकवली, ता. १३ ः एसटी महामंडळाच्या सिंधुदुर्ग विभागाने यावर्षी गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी चांगली व्यवस्था केली होती. परतीसाठी नियमित व जादा मिळून यावर्षी ३०० गाड्या सोडण्यात आल्याची माहिती रा. प. महामंडळाच्या सूत्रांकडून देण्यात आली. चाकरमान्यांना घेऊन यावर्षी मुंबईहून ३५० गाड्या सिंधुदुर्गात दाखल झाल्या होत्या. गणेशोत्सवानिमित्त मुंबई, पुणे भागातून चाकरमानी मोठ्या प्रमाणात सिंधुदुर्गमध्ये आले होते. दोन वर्षांच्या कोरोनाच्या खंडानंतर चाकरमानी यावर्षी मोठ्या प्रमाणात दाखल झाले. वैयक्तिक व ग्रुप बुकिंगच्या माध्यमातून सिंधुदुर्गात सुमारे ३५० बसेस मुंबईहून आल्या. तशाचप्रकारे परतीच्या प्रवासासाठी महामंडळाच्या सिंधुदुर्ग विभागाकडून चोख व्यवस्था करण्यात आलेली होती. त्यानुसार नियमित व जादा अशा एकूण मिळून परतीच्या प्रवासासाठी ३०० गाड्या सोडण्यात आल्या. प्रवाशांचा यावर्षी एसटीला चांगला प्रतिसाद लाभल्याचे महामंडळाच्या सूत्रांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y95873 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..