शरीरस्वास्थ्यासाठी ‘फिजिओथेरपी’ गरजेची | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शरीरस्वास्थ्यासाठी ‘फिजिओथेरपी’ गरजेची
शरीरस्वास्थ्यासाठी ‘फिजिओथेरपी’ गरजेची

शरीरस्वास्थ्यासाठी ‘फिजिओथेरपी’ गरजेची

sakal_logo
By

50013
कुडाळ ः भौतिकोपचार शिबिराचे उद्‍घाटन करताना डॉ. मकरंद परुळेकर. शेजारी उमेश गाळवणकर, डॉ. सूरज शुक्ला, डॉ. प्रगती शेटकर, डॉ. शरावती शेट्टी आदी. (छायाचित्र ः अजय सावंत)

शरीरस्वास्थ्यासाठी ‘फिजिओथेरपी’ गरजेची

डॉ. मकरंद परुळेकर ः कुडाळात भौतिकोपचार शिबिरास प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १४ ः इतरांच्या वेदनामुक्तीचा आनंद आपल्याला फार मोठे समाधान देते. वैद्यकीय सेवा ही आर्थिक समाधानाबरोबर सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा एक राजमार्ग आहे. रुग्णांसाठी शरीरावरील वाईट परिणाम टाळून शारीरिक वेदना दूर करण्यासाठी फिजिओथेरपी ही एक उत्तम उपचार पद्धती आहे, असे प्रतिपादन येथील प्रसिद्ध आर्थोपेडिक सर्जन डॉ. मकरंद परुळेकर यांनी केले.
ते येथील बॅ. नाथ पै फिजिओथेरपी महाविद्यालयामध्ये जागतिक भौतिकोपचार दिनानिमित्त आयोजित मोफत भौतिकोपचार तपासणी व उपचार शिबिरामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर, प्राचार्य डॉ. सूरज शुक्ला, डॉ. शरावती शेट्टी, डॉ. प्रगती शेटकर व सहकारी उपस्थित होते. डॉ. परुळेकर म्हणाले, ‘‘अस्थिव्यंगाच्या शस्त्रक्रिया, उपचार पद्धतीनंतर रुग्णाला सुव्यवस्थित करण्यासाठी फिजिओथेरपी उपचार पद्धतीचा उपयोग महत्त्वाचा आहे. औषधांपेक्षा व्यायामाने व विविध स्नायूंच्या शारीरिक, अवयवांच्या हालचालीच्या सरावामुळे रुग्ण बरा होऊ शकतो. यासाठी फिजिओथेरपीचा रुग्णांना चांगला लाभ होतो. गाळवणकर यांच्या प्रयत्नातून कुडाळसारख्या छोट्या शहरांमध्ये फिजिओथेरपी महाविद्यालय सुरू झालेले आहे. त्यासाठी डॉ. शुक्लांसह डॉ. शेट्टी, डॉ. शेटकर व त्यांच्या सहकारी करीत असलेले कार्य कौतुकास्पद आहे.’’ रुग्णांच्या पुनर्वसनासाठी सुरू असलेले प्रयत्न उपयुक्त व स्तुत्य असल्याचे सांगून या या प्रयत्नांना यश लाभो, अशा शुभेच्छा डॉ. परुळेकर यांनी दिल्या.
शिबिराचे उद्घाटन डॉ. परुळेकर तसेच उपस्थित रुग्ण व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. या शिबिरामध्ये ८० रुग्णांनी मोफत भौतिकोपचार तपासणी व उपचार घेतले. कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचे पदाधिकारी अजिंक्य शिंदे, प्रशांत जाधव, मानसिंग पाटील यांच्या सहकार्याने पार पडलेल्या रक्त तपासणी शिबिराचा शंभरपेक्षा अधिक गरजू रुग्णांनी लाभ घेतला. बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे कर्मचारी प्रसाद कानडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y95941 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..