जिल्ह्यात आजपासून ‘स्वच्छता ही सेवा’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्ह्यात आजपासून ‘स्वच्छता ही सेवा’
जिल्ह्यात आजपासून ‘स्वच्छता ही सेवा’

जिल्ह्यात आजपासून ‘स्वच्छता ही सेवा’

sakal_logo
By

जिल्ह्यात आजपासून ‘स्वच्छता ही सेवा’

विनायक ठाकूर ः ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात विविध कार्यक्रम

सिंधुदुर्गनगरी, ता. १४ ः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ७४१ ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ‘स्वच्छता ही सेवा’ राष्ट्रव्यापी मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) विनायक ठाकूर यांनी दिली.
दरवर्षी केंद्र व राज्याच्या सूचनांनुसार या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यावर्षीही केंद्र व राज्याच्या या कार्यक्रमांबाबत सूचना प्राप्त झाल्या असून जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात दृष्यमान स्वच्छता कार्यक्रमांचे आयोजन करणे, गावातील कचराकुंड्या व असुरक्षित ठिकाणांची साफसफाई करणे, कचरास्रोतांच्या ठिकाणी ओला व सुका कचरा वर्गीकरणाबाबत जागृती करणे, कचरा संकलन आणि विलगीकरण करण्यासाठी केंद्रनिर्मिती, प्लास्टिकसारखा अविघटनशील कचरा एकत्रित करून नियोजन करणे, गावातील पाणवठ्यांजवळील परिसर स्वच्छ ठेवून त्यांच्या सभोवती वृक्षारोपण करणे, एकल प्लास्टिक (सिंगल यूज) वापराच्या दुष्परिणामांबद्दल सभा आयोजित करून जागृती करणे, यापूर्वी प्लास्टिक वापरावर बंदीबाबत घेतलेल्या ठरावांची अंमलबजावणी करणे, हागणदारीमुक्ती आदी घटकांवर सरपंच संवाद आयोजित करणे, कचरा न करण्याबाबत घोषवाक्य लेखन स्पर्धा आयोजित करणे तसेच प्रतिज्ञा घेणे, प्लास्टिक बंदी व स्वच्छता या विषयावर वक्तृत्व, निबंध, रांगोळी, सजावट, देखावा स्पर्धेचे आयोजन करणे आदी कार्यक्रमांचे आयोजन ‘स्वच्छता ही सेवा’, या मोहिमेदरम्यान करण्यात येणार आहे. यामध्ये जिल्हावासीयांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) ठाकूर यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y95944 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..