संक्षिप्त-2 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त-2
संक्षिप्त-2

संक्षिप्त-2

sakal_logo
By

नांदेडमध्ये होणार
सर्पमित्रांचा सन्मान
वेंगुर्ले, ता. १४ ः नांदेड, हिंगोली मित्रमंडळातर्फे डॉ. संजय नाकाडे आणि गुरुवर्य निखिलकुमार खैरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या सन्मान सोहळ्यात वन्यजीव क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या सर्पमित्रांना ‘द रियल हिरो अॅवार्ड २०२२’ने सन्मानित करण्यात येणार आहे. या अॅवार्डसाठी आडेली गावचे सुपुत्र, वन्यप्राणी व सर्पमित्र दीपक दुतोंडकर यांची निवड करण्यात आली.
राज्यातील १५ हजारपैकी २५१ सर्पमित्र आणि सर्पमैत्रिणींना जिल्हा नांदेड, हिंगोली मित्रमंडळ डॉ. संजय नाकाडे आणि गुरुवर्य निखिलकुमार खैरे यांच्या वाढदिवसानिमित्त वन्यजीव क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या प्राणिमित्रांचा या अ‍ॅवार्डने सन्मानित करण्यात येणार आहे. २३ ला प्रत्येक तालुक्यातील एक सर्पमित्र याप्रमाणे सिंधुदुर्गातील ४० पैकी उल्लेखनीय कामगिरी केलेल्या ८ सर्पमित्रांची निवड करण्यात आली.
---------------
वेंगुर्लेकर यांना
पुरस्कार जाहीर
ओटवणे ः महाराष्ट्र प्रदेश रुग्णहक्क परिषदेचा यावर्षीचा आदर्श कार्यकर्ता पुरस्कार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते अमित वेंगुर्लेकर यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण महात्मा गांधी जयंतीदिनी, २ ऑक्टोबरला मुंबईत आझाद मैदानाजवळ मुंबई मराठा पत्रकार संघाच्या सभागृहात होणार आहे. वेंगुर्लेकर यांनी कोरोना काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील समस्या मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेतला. रुग्णालयातील सुविधांचा अभाव प्रशासनाच्या नजरेस आणून दिला. त्यानंतरच स्वतंत्र विभागाची व्यवस्था करण्यात आली. जिल्ह्यातील काही खासगी रुग्णालयांत रुग्णांकडून आकारल्या जाणाऱ्‍या भरमसाठ बिलांच्या रकमेबाबत वेंगुर्लेकर यांनी स्वतः अर्ज दाखल केला. तसेच अनेक रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी संस्थांची मदत मिळवून दिली. अनेकदा गरजू रुग्णांसाठी स्वतः रक्तदान केले. तसेच रक्तदान शिबिर आयोजित केले.
--------------

.................

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y95946 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..