सात हजार किमीचा प्रवास करत गाठले मोटरेनल पास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सात हजार किमीचा प्रवास करत गाठले मोटरेनल पास
सात हजार किमीचा प्रवास करत गाठले मोटरेनल पास

सात हजार किमीचा प्रवास करत गाठले मोटरेनल पास

sakal_logo
By

rat१४p२.jpg
५०००४
लडाख: जगातील सर्वाधिक उंच मोटरेनल पास गाठणारे मंडणगडचे निखिल पिंपळे.
rat१४p३.jpg
५०००५
लडाखमधील यशस्वी मोहिमेत एका क्षणी निखिल पिंपळे.
---------------
सात हजार किमीचा प्रवास करत गाठले मोटरेनल पास
सर्वाधिक उंच ठिकाण ; निखिल पिंपळेंचा विक्रम, २२ दिवसांचा प्रवास, ऐतिहासिक स्थळांना भेटी
सचिन माळी ः सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. १४ ः रस्त्यामार्गे दुचाकीवरून अकरा राज्यातून प्रवास करताना पाहिलेले शंभर अपघात, क्षणाक्षणाला बदलणारे वातावरण, चुंबकीय क्षेत्र, उंचावर जाणवणारी ऑक्सिजनची कमतरता अशा प्रतिकूल परिस्थितीत मंडणगडमधील निखिल पिंपळे यांनी मंडणगड ते लडाख असा सात हजार किमी प्रवास करत १९ हजार ३०० फुटावर असणारे जगातील सर्वाधिक उंच मोटरेनल पास म्हणजे उमलिंग ला पास हे ठिकाण गाठले.
प्रवासाची प्रचंड आवड असणारे गिर्यारोहक, भ्रमंतीकार पिंपळे यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पूर्वसंध्येला १४ ऑगस्टला मंडणगडमधून प्रवास सुरू केला. मुंबई ते देशाची राजधानी दिल्ली गाठताना गुजरात, राजस्थान, हरयाणा, दिल्ली, चंदिगढ असा एकट्याने प्रवास केला. नंतर तेथून राईड फॉर ब्रदरहुड टीमसोबत पंजाब, जम्मू-काश्मीरकडे कूच केली. येथून त्यांची खऱ्या अर्थाने कसोटी सुरू झाली. अनंत नाग, अमरनाथ, अर्वती पूर, कारगिल, गुलमर्ग, जम्मू, पटणी टॉप, वैष्णोदेवी कट्टा, श्रीनगर, जोजीला पास, मग्नेटिक हील, टायगर हिल, फोटुला पास, हाल ऑफ फेम, लेह, दल सरोवर, चांगला पास, टायलिंग ला पास, लाचुंग ला पास ओलांडून खारदुलानंतर १९ हजार ३०० फुटांवर जगातील सर्वांत उंचावरील मोटरेनल पास असणारे उमलिंग ला पास गाठले. २२ दिवसांतील प्रवासात ११ दिवस एकट्याने प्रवास केला. या दरम्यान त्यांनी प्रवासमार्गावर असणाऱ्या मुंबई, सुरत, पानिपत, करनाल, कुरूक्षेत्र, पठाणकोट, कारगिल, उज्जैन, ग्वालियर, महू, रावर खेडी, शिवपुरी, बडोदा, उदयपूर, अजमेर, रोहतक, अंबाला, मोहाली, फतेहगड, मनाली, कुल्लू, शिमला, आग्रा, झाशी, मथुरा अशा अकरा राज्यातील ऐतिहासिक महत्व असणाऱ्या स्थळांना भेटी दिल्या. या यशस्वी मोहिमेनंतर मंडणगडमध्ये त्यांचे नातेवाईक, मित्रपरिवार यांच्याकडून जोरदार स्वागत करण्यात आले.
------------
चौकट
तीन देशांच्या सीमा अन् ९ किमी बोगदा प्रवास
या संपूर्ण मोहिमेत पिंपळे यांनी चीन, पाकिस्तान, तिबेट अशा तीन देशांच्या सीमेवरून जीवावर बेतणारा प्रवास केला. तसेच बर्फवृष्टी झाल्यानंतर कोरड्या वाटणाऱ्या नद्या अचानक दुधडी भरून वाहताना त्यातून आपल्या निरीक्षणबुद्धी आणि समयसुचकता दाखवत धाडसाने यशस्वी मार्गक्रमण करताना आपल्या सहकाऱ्यांनादेखील स्फूर्ती दिली. हिमाचल प्रदेशमध्ये येताना अटल टर्नर हा ९ किमी लांबीचा सर्वाधिक मोठा बोगदा यशस्वी पार केला.
-----------
चौकट
एका दिवसांत ८५५ किमी प्रवास
परतीच्या प्रवासात मध्यप्रदेश राज्यातील गुना ते महाराष्ट्रातील पुणे हे ८५५ किमीचे अंतर एका दिवसांत पार करून आपली शारीरिक क्षमता अधोरेखित केली. २२ दिवसांच्या प्रवासात आलेले अनुभव हे जीवन समृद्ध करण्यासोबत देशाची एकता आणि एकात्मता दर्शवणारे असल्याचे सांगितले.
-------------
कोट
संपूर्ण भारतात प्रवास करणे आणि लडाखमध्ये प्रवास करणे यामध्ये खूपच फरक आहे. फक्त वाचनात आणि ऐकण्यात आलेल्या ऐतिहासिक स्थळांना प्रवासात प्रत्यक्ष भेट दिल्यानंतर अंगावर रोमांच उभे राहिले. पराक्रमाची गाथा सांगणारी ठिकाणे, युद्धभूमी, दोन पावलावर असणारी दुसऱ्या देशांची सीमा, अप्रतिम असे देशातील नैसर्गिक सौंदर्य पाहताना कधीही भेट न झालेल्या देशातील सर्व राज्यातील सहकाऱ्यांसह स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात केलेला हा प्रवास राष्ट्रप्रेमाची अवर्णनीय अनुभूती देणारा ठरला.
- निखिल पिंपळे

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y96019 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..