महामार्गाने जाणाऱ्या एसटी सेवा रस्त्यावरून न्याव्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महामार्गाने जाणाऱ्या एसटी 
सेवा रस्त्यावरून न्याव्यात
महामार्गाने जाणाऱ्या एसटी सेवा रस्त्यावरून न्याव्यात

महामार्गाने जाणाऱ्या एसटी सेवा रस्त्यावरून न्याव्यात

sakal_logo
By

महामार्गाने जाणाऱ्या एसटी
सेवा रस्त्यावरून न्याव्यात

सामाजिक कार्यकर्ते परुळेकरांची मागणी

कणकवली, ता.१४ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महामार्ग चौपदरीकरण होण्यापूर्वी जे अधिकृत बसथांबे होते ते आता काही ठिकाणी उड्डाणपूल झाल्यामुळे सेवारस्त्याशी जोडले गेले आहेत. त्यामुळे महामार्गावरून जाणाऱ्या एसटी बसेस सेवारस्त्यावरून न्याव्यात, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते परेश परुळेकर यांनी केली आहे.
अनेक सेवा रस्त्यावरून एसटी बसेस जात नसल्‍याने प्रवाशांना चारशे ते पाचशे मीटर चालत जाऊन उभे राहावे लागत आहे. याचा त्रास जिल्ह्यातील प्रवाशांना होत आहे. मात्र सहा आसनी रिक्षा तसेच अनधिकृत खासगी वाहतूक करणारे मात्र सेवा रस्त्यावरून वाहने नेतात. यामुळे एसटीलाही प्रवाशांपासून वंचित राहावे लागत आहे. त्‍यामुळे सिंधुदुर्ग विभागातील सर्व एसटी चालक, वाहक यांना सेवा रस्त्यावरून वरून एसटी बसेस नेण्याबाबत सूचना द्याव्यात, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते परेश परुळेकर, निसार शेख, राकेश केसरकर यांनी विभाग नियंत्रक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y96039 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..