ठाकरे सरकारमुळेच प्रकल्प गुजरातला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाकरे सरकारमुळेच प्रकल्प गुजरातला
ठाकरे सरकारमुळेच प्रकल्प गुजरातला

ठाकरे सरकारमुळेच प्रकल्प गुजरातला

sakal_logo
By

ठाकरे सरकारमुळेच प्रकल्प गुजरातला

नीतेश राणे : ‘वेदान्ता-फॉक्सकॉन’च्या वाटाघाटींचा तपशील द्या

कणकवली, ता.१४ : वेदान्ता-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाण्यास उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्‍वाखालील तत्‍कालीन महाविकास आघाडी सरकार जबाबदार आहे, असा आरोप आमदार नीतेश राणे यांनी आज केला. तसेच ठाकरे सरकारच्या काळात या कंपनासोबत झालेल्या वाटाघाटींचा तपशील जाहीर करा, अशी मागणीही त्‍यांनी केली.
श्री.राणे म्‍हणाले, वेदान्ता-फॉक्सकॉन कंपनीसोबत ठाकरे सरकार फक्‍त वाटाघाटी करत राहिले. ठोस कार्यवाही होत नव्हती. त्‍यामुळे हा प्रकल्प गुंडाळण्याखेरीज या कंपनीला पर्यायच राहिला नसावा. फडणवीस सरकारच्या काळात गुंतवणुकीसाठी अव्वल असलेल्या महाराष्ट्रातून अनेक प्रकल्‍प गाशा गुंडाळत आहेत. त्‍यामुळे औद्योगिक विकासामधील महाराष्ट्राचे अव्वल स्थान मागे पडले आणि महाराष्ट्राची जागा कर्नाटकने घेतली आहे. ते म्‍हणाले, महाविकास आघाडीच्या वसुली धोरणाचा महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्राने धसका घेतला आहे. तर सरकारमधील तीन पक्षांचे समाधान करणे परवडत नसल्यामुळेच वेदान्ता-फॉक्सकॉनने प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय घेतला असावा. गेल्या अडीच वर्षांतील धोरण लकवा आणि वसुलीच्या तगाद्याला कंटाळून अनेक गुंतवणुकदारांनी महाराष्ट्राकडे पाठ फिरविली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y96040 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..