नियती कासारेचे सुयश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नियती कासारेचे सुयश
नियती कासारेचे सुयश

नियती कासारेचे सुयश

sakal_logo
By

नियती कासारेचे सुयश
दाभोळ ः टाळसुरे येथील न्यू इंग्लिश स्कूलमधील नियती कासारे या विद्यार्थिनीने राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले आहे. पात्र विद्यार्थ्यांना आठवी ते बारावीपर्यंत दरवर्षी १२ हजाराप्रमाणे ४८ हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. आर्थिक दुर्बल घटकांमधील विद्यार्थ्यांना गुणवत्तेवर शासनाकडून ही शिष्यवृत्ती दिली जाते. नियती हिला शिष्यवृत्ती परीक्षेसाठी रोशनी बुरटे, समीर भोसले, पांडुरंग शिंदे, नजीर मुसा, गौरी बारटक्के आदींनी मार्गदर्शन केले. या यशाबद्दल सह्याद्री शिक्षणसंस्थेचे कार्याध्यक्ष शेखर निकम, मुख्याध्यापक संदेश राऊत, शालेय समितीचे अध्यक्ष जयवंत जालगावकर आदींनी अभिनंदन केले आहे.
-------------
rat१४p७.jpg
५००२३
दाभोळः उपनिरीक्षक गणेश सावर्डेकर यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार करताना सहाय्यक पोलिस निरीक्षक पूजा हिरेमठ.
-----------
उपनिरीक्षक सावर्डेकरांचा सत्कार
दाभोळः दापोली तालुक्यातील दाभोळ सागरी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक गणेश सावर्डेकर हे नियत वयोमनानुसार निवृत झाल्याने त्यांना निरोप देण्यात आला. मुळ चिपळूण तालुक्यातील असणार्‍या सावर्डेकर यांनी मंडणगड, दापोली, दाभोळ, राजापूरसह विविध पोलिस ठाण्यांमध्ये सेवा बजावली. त्यांचा दाभोळ सागरी पोलिस ठाण्याच्यावतीने सहाय्यक पोलिस निरीक्षक पूजा हिरेमठ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी हेड कॉन्स्टेबल राजू मोहिते, संतोष शिंदे, पोलिस नाईक सागर कांबळे, सिद्धार्थ गायकवाड, श्रीनिवास जानवलकर उपस्थित होते.
-----------
बूस्टर डोस घेण्याकडे ग्रामस्थांची पाठ
दाभोळ ः कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला असला तरी ज्यांनी दोन डोस घेतले आहेत, त्यांना बूस्टर डोस दिला जात आहे. त्यामुळे बूस्टर डोससाठी ग्रामपंचायती, आरोग्यकेंद्रात नागरिक जाऊन बूस्टर डोस घेत आहेत. दापोलीमध्ये कोव्हॅक्सिन ४५८ तर कोव्हिशिल्ड ४ हजार ६६० अशा ५ हजार ११८ जणांनी बूस्टर डोस घेतल्याचे दापोली आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. सध्या ग्रामपंचायतींकडूनही बूस्टर डोस शिबिर थंडावल्याचे समोर आले आहे. ग्रामीण भागातील अनेक ग्रामस्थ अजूनही बूस्टर डोसपासून लांब आहेत. आरोग्यकेंद्रात जाऊन ग्रामस्थ डोस घेण्यास कंटाळा करतात; मात्र गावात आल्यास ग्रामस्थ डोस जाऊन घेतात; मात्र बरेच दिवस ग्रामपंचायतींमध्ये ‘डोस’ प्रक्रिया थंडावली असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y96066 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..