धनश्री मुसळेंना लायन्सचा पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धनश्री मुसळेंना लायन्सचा पुरस्कार
धनश्री मुसळेंना लायन्सचा पुरस्कार

धनश्री मुसळेंना लायन्सचा पुरस्कार

sakal_logo
By

rat14p13.jpg-
50067
रत्नागिरीः लायन्स क्लबचा आदर्श शिक्षिका पुरस्कार धनश्री मुसळे यांना देताना शिल्पा पानवलकर.
-----------------
धनश्री मुसळेंना लायन्सचा पुरस्कार
रत्नागिरी ः लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीचा आदर्श शिक्षक पुरस्कार भारत शिक्षण मंडळाच्या गो. भ. बियाणी बालमंदिरच्या ज्येष्ठ शिक्षिका धनश्री मुसळे यांना प्रदान करण्यात आला. लायन्स क्लबच्या अध्यक्षा शिल्पा पानवलकर यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. प्रतिवर्षी (कै.) राजश्री गडकरी स्मृतीप्रित्यर्थ या पुरस्काराचे वितरण केले जाते. हा कार्यक्रम लायन्स आय हॉस्पिटल सभागृहात नुकताच झाला. पुरस्कारप्राप्त मुसळे यांचे भारत शिक्षण मंडळाचे सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापिका प्रमोदिनी शेट्ये आणि सहशिक्षिका, कृ. चिं. आगाशे प्राथमिक विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका प्राजक्ता कदम आणि सर्व शिक्षिका, कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.
--------------
rat14p17.jpg
50101
रत्नागिरीः रज्जाक मानकर यांचा सन्मान करताना गटशिक्षणाधिकारी आनंद पळसे.
-----------
रज्जाक मानकर यांचा सन्मान
रत्नागिरीः माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ (ता. महाबळेश्वर) यांच्या वतीने गटशिक्षणाधिकारी आनंद पळसे यांच्या हस्ते रज्जाक मानकर यांचा सन्मान करण्यात आला. २९ ऑगस्टला महाबळेश्वर येथील नगरपालिका शिक्षण मंडळ कार्यालयात महाबळेश्वर तालुक्यातील सर्व माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांची सहविचार सभा गटशिक्षणाधिकारी आनंद पळसे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. सभेत दी वेलफेअर एज्यु. सोसायटी कॅम्प पुणे यांच्यावतीने आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित झाल्याबद्दल मानकर यांचा महाबळेश्वर शिक्षण विभागाच्या वतीने सत्कार करण्यात आला. मानकर हे महाबळेश्वरचे रहिवाशी असून त्यांचे प्राथमिक शिक्षण हे महाबळेश्वर येथील नगरपालिका शाळा क्र. १ येथे व माध्यमिक शिक्षण गिरीस्थान प्रशाला येथे झाले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y96068 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..