मोबाईल नेटवर्क सुधारा ः नाडकर्णी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोबाईल नेटवर्क सुधारा ः नाडकर्णी
मोबाईल नेटवर्क सुधारा ः नाडकर्णी

मोबाईल नेटवर्क सुधारा ः नाडकर्णी

sakal_logo
By

‘मोबाईल नेटवर्कचा बोजवारा’
कणकवली, ता. १४ ः शहरासह तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून बीएसएनएलसह सर्वच मोबाईल कंपन्यांच्या नेटवर्कची समस्या निर्माण झाली आहे. यामुळे अनेक व्यावसायिकांना अडचण निर्माण होत आहे. संबंधित कंपन्यांनी मोबाईल रेंजमध्ये तातडीने सुधारणा करावी, अशी मागणी येथील व्यावसायिक सुनील नाडकर्णी यांनी केली आहे. अत्यावश्यक कामांसाठी लॅण्डलाईन उपयुक्त ठरत असे; मात्र आता मोबाईलचा वापर सर्वत्र केला जातो. बीएसएनएलला योग्य प्रकारे रेंज मिळत नाही. म्हणून अन्य कंपन्यांच्या मोबाईलची सीमकार्ड घेण्यात आली; मात्र फोनना रेंज मिळत नाही. अनेकदा ओटीपी वा इतर समस्या निर्माण होतात. या कंपन्यांकडून पूर्वी देण्यात येणाऱ्या पॅकेज आता कमी दिवसांची करण्यात आली. त्याबाबतही काही म्हणणे नाही; मात्र आवश्यकवेळी रेंज मिळत नसेल तर ग्राहकांनी करायचे काय? कंपन्यांनी मोबाईल टॉवरमध्ये काही बिघाड असतील तर ते तातडीने दुरुस्त करून ग्राहकांना योग्य रेंज मिळण्याच्यादृष्टीने कार्यवाही करावी, अशी मागणीही नाडकर्णी यांनी केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y96089 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..