श्रीकृष्ण वंजारी रेकॉर्ड बुकमध्ये | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

श्रीकृष्ण वंजारी 
रेकॉर्ड बुकमध्ये
श्रीकृष्ण वंजारी रेकॉर्ड बुकमध्ये

श्रीकृष्ण वंजारी रेकॉर्ड बुकमध्ये

sakal_logo
By

श्रीकृष्ण वंजारी
रेकॉर्ड बुकमध्ये
सावंतवाडी ः सावंतवाडीचे सुपुत्र व सध्या मुंबई येथे वास्तव्यास असलेले सेव्हन डिग्री ब्लॅक बेल्ट आंतरराष्ट्रीय खेळाडू व पंच सुधीर श्रीकृष्ण वंजारी यांची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये निवड झाली आहे. वंजारी हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी शहरातील आहेत. गेली तीस-पस्तीस वर्षे ते कराटे या क्रीडा प्रकारांमध्ये त्यांनी यश मिळविले आहे. जपान येथे ओपन फाईटमध्ये ब्राँझपदक जिंकले होते. त्यांची आता बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. त्यांच्यावर सर्वत्र अभिनंदन होत आहे.
--
तेजस एक्स्प्रेस
मडगावपर्यंत
कणकवली ः कोकण रेल्वे मार्गावर सीएसएमटी करमळी-सीएसएमटी अशी धावणारी तेजस एक्स्प्रेस यापुढे मडगावपर्यंत असणार आहे. हा नवा बदल १ सप्टेंबरपासून लागू केला आहे. सीएसएमटी-मडगाव तेजस एक्सप्रेस (२२११९) दर मंगळवार, बुधवार, शुक्रवार, शनिवार, रविवार या दिवशी सकाळी ५.५० वाजता सीएसएमटी येथून सुटेल व त्याच दिवशी दुपारी २.४० वाजता मडगाव येथे पोहोचेल. मडगाव-सीएसएमटी तेजस एक्स्प्रेस वरील वारांनाच दुपारी ३.१५ वाजता मडगाव येथून सुटेल व त्याच दिवशी रात्री ११.५५ वाजता सीएसएमटी येथे पोहोचेल. गाडीला दादर, ठाणे, पनवेल, चिपळूण, रत्नागिरी, कुडाळ, करमळी या स्थानकांवर थांबा असल्याची माहिती कोकण रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
----------------
महिला पतसंस्थेची
रविवारी सभा
सावंतवाडी ः सावंतवाडी तालुका महिला नागरी सहकारी पतसंस्थेची २८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा १८ ला सायंकाळी ४.३० वाजता संस्थेच्या कार्यालयात आयोजित केली आहे. या बैठकीला सर्व सभासदांनी उपस्थित राहवे, असे आवाहन पतसंस्थेच्या चेअरमन श्वेता शिरोडकर यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y96097 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..