प्रकाश पाध्येंना शिक्षण विस्तार अधिकारीपदी पदोन्नती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रकाश पाध्येंना शिक्षण विस्तार अधिकारीपदी पदोन्नती
प्रकाश पाध्येंना शिक्षण विस्तार अधिकारीपदी पदोन्नती

प्रकाश पाध्येंना शिक्षण विस्तार अधिकारीपदी पदोन्नती

sakal_logo
By

rat14p22.jpg
50127
प्रकाश पाध्ये
-----------
शिक्षण विस्तार अधिकारीपदी
प्रकाश पाध्ये यांना पदोन्नती
राजापूर, ता. १४ः तालुक्यातील ओझर गावचे सुपुत्र आणि रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढीचे विद्यमान उपाध्यक्ष प्रकाश पाध्ये यांची शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून पदोन्नती झाली आहे. विस्तार अधिकारी म्हणून ते राजापूर पंचायत समितीच्या शिक्षण विभागामध्ये रूजू झाले असून झालेल्या या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
सुमारे ३९ वर्षापूर्वी पाध्ये शिक्षक म्हणून सेवेमध्ये रूजू झाले. शिक्षक म्हणून त्यांनी तालुक्यातील विविध भागांमधील शाळांमध्ये सेवा बजावली. गेली सुमारे दहा वर्ष ते उच्च श्रेणी मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. शिक्षणक्षेत्रातील जाण असलेले पाध्ये यांनी शिक्षक म्हणून अनेक गुणवत्तापूर्ण विद्यार्थी घडवले आहेत. त्यांची नुकतीच विस्तार अधिकारी म्हणून पदोन्नती झाली असून त्यांची येथील पंचायत समितीच्या शिक्षण विभागामध्ये नियुक्ती झाली आहे. पंचायत समितीच्या शिक्षण विभागामध्ये विस्तार अधिकारी म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला असून तालुक्यातील राजापूर बीटचा पदभार देण्यात आला असून देवाचे गोठणेची अतिरिक्त जबाबदारी दिली आहे. महाराष्ट्र पुरागोमी प्राथमिक शिक्षक संघटनेचे जिल्हा नेते म्हणून कार्यरत असलेले पाध्ये रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढीचे विद्यमान उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. संघटनेच्या माध्यमातून त्यांनी शासन आणि प्रशासकीय स्तरावर सातत्याने पाठपुरावा करून शिक्षकांच्या विविध समस्या आणि प्रश्‍न सोडवले आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y96113 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..