पतीसोबत खरेदीला आलेली पत्नी बेपत्ता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पतीसोबत खरेदीला आलेली पत्नी बेपत्ता
पतीसोबत खरेदीला आलेली पत्नी बेपत्ता

पतीसोबत खरेदीला आलेली पत्नी बेपत्ता

sakal_logo
By

पतीसोबत खरेदीला आलेली पत्नी बेपत्ता
लांजा ः गणेशोत्सवासाठी सामान खरेदीसाठी आलेली महिला शहरातील कोत्रे हॉटेलसमोरून बेपत्ता झाल्याची घटना ३० ऑगस्टला दुपारी घडली आहे. या प्रकरणी लांजा पोलिसात सोमवारी १२ सप्टेंबरला सायंकाळी उशिरा ती बेपत्ता झाल्याची फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लांजा तालुक्यातील हर्चे उभावाडा येथील नारायण यशवंत कुवार (वय ५०) यांनी याची फिर्याद लांजा पोलिसात केली आहे. नारायण कुवार हे ३० ऑगस्टला पत्नी नम्रता नारायण पवार (वय ४५) तिच्यासह लांजा येथे आले होते. गणपती सणासाठी लागणारे साहित्य खरेदी केल्यानंतर पत्नीजवळ सामान ठेवून दुपारी १.१५ वाजण्याच्या दरम्यान ते आपण बाथरूमला जाऊन येतो, असे सांगून गेले होते. त्यांची पत्नी लांजा शहरातील कोत्रे हॉटेलसमोर उभी होती. बाथरूमला जाऊन आले असता नारायण कुवार यांना त्या ठिकाणी पत्नी नसल्याचे आढळून आले.
---------
जहाजावरील केबलची चोरी
दाभोळ ः दाभोळजवळ असलेल्या उसगाव येथील भारती शिपयार्ड कंपनीच्या व्ही ३६८ या जहाजावरील २५ हजार २०० रुपये किमतीची तांब्याची केबल चोरी करणाऱ्या संशयितांना दाभोळ सागरी पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी अटक करून न्यायालयासमोर हजर केले. त्याची जामिनावर मुक्तता करण्यात आली. उसगाव येथील भारती शिपयार्ड कंपनी गेले काही वर्ष बंद आहे. त्याचा फायदा घेत काही लोक या कंपनीत असलेल्या भंगाराची चोरी करत असल्याचे स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी याची माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांना सांगितली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी तपासणी करून जे साहित्य चोरीला गेले आहे, त्याबाबत दाभोळ सागरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. अज्ञातांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपास करून विजय दाभोळकर, अनिकेत मयेकर, चंद्रहास फणसकर, मकसूद खान, आशिष जांभारकर, योगेश बागकर (सर्व रा. दाभोळ) या संशयितांना अटक केली असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले.
---------
देर्देत घरातून दागिने चोरीस
दाभोळ ः दापोली तालुक्यातील देर्दे-खोतवाडी येथील घरातून ४० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची तक्रार दाभोळ सागरी पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. याबाबत पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार, देर्दे खोतवाडी येथील धनश्री वैभव कोकीरकर यांनी ३१ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या वेळी त्यांच्या माहेरच्या घरातील स्वयंपाकघरातील लाकडी कपाटात प्लास्टिकच्या डब्यात त्यांचे दागिने ठेवले होते. ४ सप्टेंबरला दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास गौरी पाहण्यासाठी दागिने घालून जाण्यासाठी त्यांनी दागिन्याचा डबा उघडला असता त्यांना त्यात दागिने दिसले नाहीत. डब्यातील ४० हजार रुपये किमतीचे ४ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने चोरल्याची तक्रार त्यांनी दाभोळ सागरी पोलिसात दाखल केली आहे.
.............
rat१४p१८.jpg
50102
दाभोळः आंब्याच्या झाडावर आदळलेली एसटी.
-----------
बोरिवली- दापोली बसला अपघात
दाभोळ ः दापोली शहरानजीक असणाऱ्या खोंडा येथे बोरिवली-दापोली बससमोर महिला आल्याने तिला वाचवण्याच्या प्रयत्नात एसटीला अपघात झाला; मात्र या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी (ता. १३) चालक परशुराम चिबडे हे आपल्या ताब्यातील बोरिवली ही बस घेऊन दापोलीला येत होते. संध्याकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास मंडणगड मार्गावरील खेर्डी फाटा सोडून बस पांढरेवाडी येथे आली असता एक महिला बससमोर आली. तिला वाचवण्याकरिता चालकाने ब्रेक दाबले असता पाऊस असल्यामुळे गाडी रस्त्यावरून घसरून रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या आंब्याच्या झाडावर आदळली. यामुळे बसची काच फुटून बसचे किरकोळ नुकसान झाले आहे. या अपघातावेळी बसमध्ये ईश्वर खंडागळे हे वाहक आणि दोन प्रवासी होते.
...........
हेदलीमध्ये गावठी हातभट्टीची दारू जप्त
खेडः हेदली बाजारवाडी येथे सोमवारी (ता. १२) हातभट्टीची दारूसोबत एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या वेळी सुमारे १२५० रुपये किमतीची २५ लिटर दारू जप्त करण्यात आली आहे. गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी (ता. १२) दुपारी १२.१० वा. पोलिसांनी खेड तालुक्यातील हेदली बाजारवाडी येथे टाकलेल्या धाडीत सुनील विष्णू शिंदे (४८, रा. हेदली-बाजारवाडी, ता. खेड, रत्नागिरी) याच्याजवळ सुमारे १२५० रुपयांची २५ लिटर गावठी हातभट्टीची दारू आढळून आली.
---
लोटेतून दुचाकीची चोरी
खेडः तालुक्यातील व लोटे-परशुराम औद्योगिक क्षेत्रातील एम्को पेस्टिसाईड लिमिटेड कंपनीच्या गेटसमोर पार्किंग करून ठेवलेली दुचाकी चोरीप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध येथील पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मनिष वसंत निकम (वय २८, रा. तांबरीचीवाडी, कुळवंडी, खेड) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. मनीष निकम याची दुचाकी (एमएच-०८-एआर-६३२९) एम्को पेस्टिसाईड लिमिटेड कंपनीच्या गेटसमोर पार्किंग करून ठेवलेली होती. ही गाडी चोरीला गेली आहे.
-----------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y96131 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..