ई- केवायसीत रत्नागिरी तालुका अव्वल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ई- केवायसीत रत्नागिरी तालुका अव्वल
ई- केवायसीत रत्नागिरी तालुका अव्वल

ई- केवायसीत रत्नागिरी तालुका अव्वल

sakal_logo
By

ई- केवायसीत रत्नागिरी तालुका अव्वल
किसान सन्मान ; जिल्ह्यात ६९ टक्के काम पूर्ण
रत्नागिरी, ता. १४ ः प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या लाभार्थीचे इ केवायसी अर्थात आधारकार्ड लिंक करण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये रत्नागिरी तालुका अव्वल ठरला आहे.
रत्नागिरी तालुक्यातील २९ हजार ६४१ लाभार्थीपैकी २३ हजार ७२५ लाभार्थीचे इ केवायसी करून ८० टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे. त्या खालोखाल गुहागर १६ हजार ३३६ आणि मंडणगडने ४ हजार ७५९ लाभार्थीचे आधार लिंक करत ७६ टक्के लक्ष्य पूर्ण केले आहे. चिपळूण ७४ टक्के तर राजापूर ७१ टक्क्यांपर्यंत पोचला असून त्यांनी अनुक्रमे २१ हजार ४ आणि १४ हजार २२६ लाभार्थीपर्यंत पोचण्यात यश मिळवले आहे. संगमेश्वर, लांजा आणि खेडने साठ टक्क्यांवर कामगिरी केली आहे. यामध्ये संगमेश्वर ६७ टक्क्यांसह २२ हजार ९२९, लांजा ६३ टक्क्यांसह १० हजार ५५६, तर खेड तालुका ६० टक्क्यांसह ११ हजार ८१३ लोकांपर्यंत पोचला आहे. सर्वात शेवटी असलेला दापोली तालुक्याने ५७ टक्के उद्दिष्ट पूर्ण केले असून येथील १६ हजार ३९३ लाभार्थीचे इ केवायसी पूर्ण झाले. संपूर्ण जिल्ह्यातील दोन लाख चार हजार ७४१ लाभार्थीपैकी ६९ टक्के आधार जोडणीचे काम पूर्ण झाले असून ६२ हजार ७१३ जोडणी अजून शिल्लक असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या मोहमेतून अनोळखी लाभार्थीची नावे शोधून ती रद्द करण्याचा उद्देशही साधला जाणार आहे. त्यात जिल्ह्यातील एकूण ५० हजार ५५५ नावे अपात्र असल्याचे उघड झाले आहे. अनोळखी लाभार्थी नोंदीवरून रत्नागिरी आणि संगमेश्वरनंतर दापोली तालुक्यात दोन हजार ६८९ नावं अपात्र ठरणार आहेत. इतर सर्व तालुक्यांत अशा लाभार्थीची नोंद एक हजारांपेक्षा कमी आहे, असे एका अधिकृत आकडेवारीवरून स्प्ष्ट झाले आहे. ही इकेव्हायसी झाल्यानंतर लाभार्थीच्या खात्यावर प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा दोन हजार रुपयांचा हप्ता जमा केला जाणार आहे. त्यामुळे शासकीय यंत्रणेतील ग्रामसेवक, कृषी सहाय्यक आणि तलाठी यांसह संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना १०० टक्के इ केवायसी करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y96134 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..