नडगिवे नॅशनल स्कूलमध्ये राष्ट्रभाषा दिन उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नडगिवे नॅशनल स्कूलमध्ये 
राष्ट्रभाषा दिन उत्साहात
नडगिवे नॅशनल स्कूलमध्ये राष्ट्रभाषा दिन उत्साहात

नडगिवे नॅशनल स्कूलमध्ये राष्ट्रभाषा दिन उत्साहात

sakal_logo
By

50133
नडगिवे ः हिंदी भाषेचे महत्त्व विशद करताना मुख्याध्यापक एस. वाय. निकम. (छायाचित्र : एन. पावसकर)

नडगिवे नॅशनल स्कूलमध्ये
राष्ट्रभाषा दिन उत्साहात
तळेरे, ता. १४ : आदर्श एज्युकेशन सोसायटी खारेपाटण संचालित नडगिवे येथील नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये राष्ट्रभाषा हिंदी दिन बुधवारी उत्साहात साजरा झाला. यावेळी विद्यार्थ्यांनी हिंदी राष्ट्रभाषेचे महत्त्व विशद केले.
मुख्याध्यापक एस्. वाय्. निकम यांनी हिंदी सहज, सुलभ, सोपी आणि सहज समजणारी भाषा असल्याचे सांगून जेव्हा भारतातील अनेक भाषांतून भारताची राष्ट्रभाषा कोणती असावी, हा प्रश्न उपस्थित झाला, तेव्हा हिंदी भारताच्या अधिकांश भागात बोलली जात असल्याने तसेच लिहायला व समजण्यास सोपी ती राष्ट्रभाषा ठरविल्याचे सांगितले. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये हिंदी राष्ट्रभाषा संदर्भात सुसंवाद झाला. शिक्षक राधेश्याम पांडेय, प्रतिभा राऊत, फरहीन पटेल यांनी हिंदी राष्ट्रभाषा होण्याचा इतिहास कथन केला. आयेशा पटेल, मदिहा सातकूट, नबिहा काझी, अमिना पटेल, निशा रायका, अर्णव राणे, हादिया सारंग, जिदान सारंग या विद्यार्थ्यांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी कौस्तुभ देसाई, तानाजी पाटील, विजय पाटील, शत्रुघ्न कोरे, उदय दुदवडकर, सुयोग राजापकर, अभय तावडे, सोनाली पाटील, तेजश्री भोकरे, संपदा पाटील, गौरी पवार, चिन्मयी पराडकर, सावी सावंत, संदीप चव्हाण, अनिल कर्ले, संतोष मोर्ये, विजया मोर्ये, शीतल मांजरेकर उपस्थित होते. ओंकार गाडगीळ यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y96135 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..