पावसाचा जोर ओसरल्याने दिलासा जोर ओसरला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पावसाचा जोर
ओसरल्याने दिलासा
जोर ओसरला
पावसाचा जोर ओसरल्याने दिलासा जोर ओसरला

पावसाचा जोर ओसरल्याने दिलासा जोर ओसरला

sakal_logo
By

पावसाचा जोर
ओसरल्याने दिलासा
वैभववाडी, ता. १४ ः गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर आज काहीसा ओसरला. अधूनमधून सरी कोसळत असून पाऊस उघडीप देत असल्याचे चित्र आहे. पावसाचा जोर ओसरल्यामुळे जिल्ह्यातील नदीनाल्यांच्या पाणीपातळीत देखील घट झाली आहे. त्यामुळे दिलासा मिळाला आहे.
गेल्या सहा-सात दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू होता. त्यामुळे जिल्ह्याच्या काही भागात पूरस्थिती निर्माण झाली होती. अनेक गावांचा संपर्क देखील तुटला होता. नदीनाल्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली होती. दरम्यान, हवामान विभागाने बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या वादळामुळे पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज दिला होता; परंतु कालपासून जिल्ह्यात पावसाचा जोर कमी होण्यास सुरुवात झाली आहे. काल (ता. १३) सकाळी दहापर्यंत पावसाचा जोर होता; मात्र त्यानंतर कमी झाला. दिवसभर हलक्या सरी पडत होत्या. सकाळपासून देखील हलक्या सरी पडल्या. सायंकाळी काही भागात जोरदार सरी कोसळल्या; परंतु काही वेळानंतर उघडीप होती. पावसाचा जोर ओसरल्यामुळे संभाव्य पुराचा धोका टळला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y96176 Txt Sindhudurg1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..