पास्ते, बरागडेंचा सावरवाड येथे सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पास्ते, बरागडेंचा सावरवाड येथे सत्कार
पास्ते, बरागडेंचा सावरवाड येथे सत्कार

पास्ते, बरागडेंचा सावरवाड येथे सत्कार

sakal_logo
By

swt152.jpg
50215
सावरवाडः संदीप बारागडे, सिद्धेश पास्ते, अर्जुन मिस्त्री यांना गौरविताना रवींद्र मडगावकर, अॅड. संतोष सावंत. बाजूला सुप्रिया मडगावकर, महेंद्र दळवी, रेशमा नाईक, अदिती चव्हाण, दाजी कुडतरकर, पूर्वा नाईक, निर्मला कुडतरकर आदी.

पास्ते, बरागडेंचा सावरवाड येथे सत्कार
सह्याद्री फाउंडेशनचा पुढाकार ः इंडियन नेव्हीत भरती झाल्याने सन्मान
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १५ः सावरवाड-धनगरवाडी येथील संदीप बरागडे व कलंबिस्त-दुर्गावाडी येथील सिद्धेश पास्ते हे दोघेही इंडियन नेव्हीमध्ये भरती झाले. त्याबद्दल त्यांचा सह्याद्री फाउंडेशन, सावरवाड ग्रामपंचायत व प्राथमिक शाळा यांच्यावतीने भेटवस्तू, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. सावरवाड प्राथमिक शाळेत हा सत्कार कार्यक्रम झाला.
प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा बँकेचे संचालक रवींद्र मडगावकर, सह्याद्री फाउंडेशनचे माजी सचिव तथा कोकण मराठी साहित्य परिषदेचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष अॅड. संतोष सावंत, सरपंच सुप्रिया मडगावकर, उपसरपंच तेजस्विनी कुडतरकर, महेंद्र दळवी, नयना लाड, मुख्याध्यापिका रश्मी नाईक, शिक्षिका अदिती चव्हाण, अनिल मेस्त्री, दाजी कुडतरकर, निर्मला कुडतरकर, अनिता काळे, पूर्वा नाईक, मोरजकर, पाटील, मनस्वी पवार, गुरुनाथ वर्धम, विठ्ठल बरागडे, बरागडे आदी उपस्थित होते. यावेळी इंडियन नेव्हीमध्ये नियुक्त झालेले बरागडे, पास्ते यांच्यासह तबलावादनात यश मिळविलेले अर्जुन मेस्त्री यांचा मडगावकर व सावंत यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
यावेळी बरागडे यांनी मनोगत व्यक्त करताना, आई-वडिलांच्या आशीर्वादाने आणि गुरुजनांच्या मार्गदर्शनामुळे मी इंडियन नेव्हीमध्ये सहज भरती झालो. या यशात या सर्वांचा वाटा आहे, असे सांगितले. पास्ते म्हणाले की, मोबाईलचे आकर्षण टाळून अभ्यासाकडे विशेष लक्ष द्या. दहावीत यशस्वी झालात तर पुढे चांगले यश मिळवू शकता. इतर गोष्टी पुढील आयुष्यात करता येतील, पण गुणवत्ता मागे पडल्यास पुढे यशस्वी होताना कठीण होईल. मडगावकर यांनी या दोन्ही तरुणांचा आदर्श घेऊन वाटचाल करा, असे आवाहन केले. अॅड. सावंत यांनी कोमसापतर्फे विद्यार्थ्यांना सहकार्यासह साहित्य चळवळ पुढे नेण्यासाठी प्रयत्नरत असल्याचे सांगितले. मुख्याध्यापिका नाईक, सरपंच मडगावकर यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रभाकर भुले यांनी, आभार महेंद्र दळवी यांनी मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y96271 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..