प्रा. भारमल यांचा सावंतवाडीत सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रा. भारमल यांचा सावंतवाडीत सत्कार
प्रा. भारमल यांचा सावंतवाडीत सत्कार

प्रा. भारमल यांचा सावंतवाडीत सत्कार

sakal_logo
By

swt१५४.jpg
५०२१७
सावंतवाडी : श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एल. भारमल यांना गौरविताना श्रीमंत खेमसावंत भोसले.

प्रा. भारमल यांचा सावंतवाडीत सत्कार
‘एसपीके’चा पुढाकार ः संस्थेतर्फे प्रामाणिक सेवेचा सन्मान
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १५ः येथील श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एल. भारमल यांना मुंबई विद्यापीठाचा ‘आदर्श प्राचार्य’ हा पुरस्कार मिळाला. याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीचे अध्यक्ष राजेसाहेब श्रीमंत खेमसावंत भोसले त्यांच्या हस्ते त्यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.
व्यासपीठावर सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन राणीसाहेब श्रीमंत शुभदादेवी भोसले, संस्थेचे कार्यकारी विश्वस्त युवराज लखमसावंत भोसले, युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले उपस्थित होते.
प्रा. भारमल यांनी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथून एम.एस्सी प्राणिशास्त्र ही पदवी धारण केल्यानंतर ते १९८७ मध्ये पंचम खेमराज महाविद्यालयाच्या प्राणिशास्त्र विभागामध्ये अधिव्याख्याता या पदावर रुजू झाले. २००८ पासून त्यांनी प्राचार्य पदाचा पदभार स्वीकारला. त्यांनी शिक्षण क्षेत्रातील बहुमूल्य पी.एच.डी. १९९६ व त्यानंतर पुन्हा २०१२ अशी दोनवेळा प्राप्त केली. त्यानंतर एल.एल.बी. पदवी मिळविली. महाविद्यालयाचे प्रशासन सांभाळत असताना ते राष्ट्रीय आणि विद्यापीठ स्तरावरील विविध कमिट्यांवर कार्यरत आहेत. संस्थेचे अध्यक्ष राजेसाहेब यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक करून अशीच प्रगती होत राहो, अशा शुभेच्छा दिल्या. यावेळी मंडळाचे संचालक प्रा. डी. टी. देसाई, सहसंचालक अॅड. श्यामराव सावंत, महाविद्यालयातील प्रथम प्रा. डॉ. कोपरकर यांचे कुटुंबीय, माजी प्राध्यापक वर्ग, माजी विद्यार्थी, महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन हिंदी विभाग प्रमुख डॉ. प्रा. डी. जी. बोर्डे यांनी, आभार अमित कोपरकर यांनी मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y96274 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..