खो-खो निवड चाचणी ऑक्टोबरमध्ये | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खो-खो निवड चाचणी ऑक्टोबरमध्ये
खो-खो निवड चाचणी ऑक्टोबरमध्ये

खो-खो निवड चाचणी ऑक्टोबरमध्ये

sakal_logo
By

खो-खो निवड चाचणी ऑक्टोबरमध्ये
मालवणात आयोजनः जिल्ह्याचा किशोर-किशोरी संघ निवडणार
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १५ः जिल्हा खो-खो असोसिएशनची २०२२-२३ ची किशोर-किशोरी गटाची जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा मालवण येथील धुरीवाडा कन्याशाळेत ८ ऑक्टोबरला आयोजित केली आहे. या स्पर्धेतून ३७ व्या राज्य अजिंक्यपद व निवड चाचणीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा किशोर-किशोरी संघ निवडण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेत सहभागी होणार्‍या संघांनी स्पर्धेच्या दिवशी सकाळी ९ वाजेपर्यंत उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
स्पर्धेत ३ नोव्हेंबर २००८ नंतर जन्मलेले किशोर-किशोरी खेळाडू सहभागी होऊ शकतील. खेळाडूचे वय, उंची (सेंटीमीटर), वजन यांची बेरीज २१५ होणे आवश्यक आहे. खेळाडूंनी १०० रुपये नोंदणी शुल्क भरावयाचे आहे. ७ ते ८ ऑक्टोबरला सकाळी ९ वाजेपर्यंत प्रवेश स्वीकृती राहील. काही कारणास्तव खेळाडूंचे नावासहीत प्रवेश अर्ज मुदतीत पाठविणे शक्य नसल्यास तसे लेखी कळवावे. खेळाडू नववी अथवा त्या खालील वर्गात शिकत असला पाहिजे. प्रवेश अर्ज शाळा, क्लब, संस्था यांच्या लेटरहेडवर देणे आवश्यक आहे. जन्म दाखला झेरॉक्स आवश्यक आहे. प्रत्येक संघात १५ खेळाडूंचा समावेश असेल. प्रत्येक खेळाडूच्या पाठीवर सामनाधिकार्‍यांना दिसेल असा क्रमांक असणे गरजेचे आहे. स्पर्धा बाद पद्धतीने खेळविण्यात येणार आहे. खेळाडूंचे मूल्यांकन स्पर्धेच्या ठिकाणी ८ ला सकाळी केले जाईल. स्पर्धेत सहभागी होणार्‍या खेळाडूंची निवास व भोजन व्यवस्था केलेली नाही. सहभागी होणाऱ्या संघांनी आपला प्रवेश अर्ज ७ ऑक्टोबरपर्यंत या tausandeep@gmail.com ई-मेलवर पाठवावा. यामध्ये जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभागी व्हावे, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा खो-खो असोसिएशनचे अस्थायी समिती अध्यक्ष संदीप तावडे यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y96275 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..