राजापूर-राजापुरातील 10 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे बिगूल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर-राजापुरातील 10 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे बिगूल
राजापूर-राजापुरातील 10 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे बिगूल

राजापूर-राजापुरातील 10 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे बिगूल

sakal_logo
By

89621
...........................

राजापुरात दहा ग्रामपंचायतींमध्ये निवडणुक
कार्यक्रम जाहीर; राजकीय पक्षांसह इच्छुक उमेदवारांकडून मोर्चेबांधणीला सुरवात
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १६ ः कोरोना महामारीमुळे रखडलेल्या राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. त्यामध्ये तालुक्यातील दहा ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या निवडणुकीमध्ये ग्रामपंचायत सदस्यांसह सरपंचाची थेट मतदारांमधून निवड होणार आहे. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांपूर्वी होत असलेल्या या ग्रामपंचायत निवडणुकांना राजकीयदृष्ट्या महत्व प्राप्त झाले असून राजकीय पक्षांसह इच्छुक उमेदवारांकडून मोर्चेबांधणीला सुरवात झाली आहे.
ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा गत आठवड्यामध्ये निवडणूक आयोगाकडून करण्यात आली. या ग्रामपंचायत निवडणुकांच्या घोषणेमुळे गावागावातील राजकीय वातावरण आता तापू लागले आहे. गावागावामध्ये वाडीनिहाय बैठका घेऊन त्याद्वारे संभाव्य उमेदवार चाचपणी करण्यावर सध्या राजकीय पक्षांसह गावपुढार्‍यांकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतील इच्छुक उमेदवारही या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये वर्चस्व राखण्यासाठी कंबर कसताना दिसत आहेत.
----------
चौकट
निवडणूक कार्यक्रम ः
२१ ते २७ सप्टेंबर ः नामनिर्देशपत्र दाखल करणे
२८ सप्टेंबर ः नामनिर्देशनपत्र छाननी
३० सप्टेंबर ः नामनिर्देशन पत्र मागे घेणे
१३ ऑक्टोबर ः मतदान
१४ ऑक्टोबर ः मतमोजणी
---------------
चौकट
निवडणुका होत असलेल्या ग्रामपंचायती
सागवे, देवाचे गोठणे, भालावली, मूर, आंगले, वडदहसोळ, केळवली, राजवाडी, कोंड्येतर्फे सौंदळ, मोगरे.
----------
चौकट
थेट सरपंच निवड ठरणार आव्हानात्मक
या निवडणुकीमध्ये सरपंचपदाची ग्रामपंचायत सदस्यांमधून निवड न होता थेट मतदारांमधून होणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीवरील राजकीय वर्चस्वाच्यादृष्टीने जास्तीत जास्त ग्रामपंचायत सदस्यांसह सरपंचही आपल्याच पक्षाचा निवडून आणणे राजकीय पक्षांसाठी महत्वाचे ठरणार आहे. त्यामुळे सरपंचपदाचा उमेदवार निश्‍चित करताना सर्वसमावेशक चेहऱ्यासह अन्य विविध निकषांची पडताळणी राजकीय पक्षांना करावी लागणार आहे. सरपंच उमेदवारीसह त्याला विजयी करणे राजकीय पक्षांसाठी आव्हानात्मक ठरणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y96327 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..