खेड ः भटक्या कुत्र्यांच्या टोळीची खेडात दहशत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खेड ः  भटक्या कुत्र्यांच्या टोळीची खेडात दहशत
खेड ः भटक्या कुत्र्यांच्या टोळीची खेडात दहशत

खेड ः भटक्या कुत्र्यांच्या टोळीची खेडात दहशत

sakal_logo
By

याबातमी शेजारी बातमी- Y९६३३५

फोटो ओळी
-rat१५p४ ः KOP२२L५०२२० खेड ः शहरात फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांच्या टोळ्या.
-----------
भटक्या कुत्र्यांच्या टोळीची खेडात दहशत
वाहनचालकांनाही भरते धडकी ; निर्बिजीकरण आवश्यक
खेड, ता. १४ ः शहरात दिवसेंदिवस मोकाट कुत्र्यांच्या संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे टोळ्यांनी कुत्री पाहून नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. लहान मुलांपासून ते वाहनचालक जखमी होण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. रात्री शहरातील काही भागात नागरिक जीव मुठीत घेऊन ये-जा करत आहेत.
खेड शहरात गेल्या अनेक दिवसांपासून शहरातील विविध भागात मोकाट कुत्र्यांनी नागरिकांना हैराण केले आहे. बसस्थानक, पोलिस ठाणे, न्यायालय परिसर, हुतात्मा अनंत कान्हेरे चौक, बाजारपेठ, गुजरआळी, मटण मच्छीमार्केट, छत्रपती शिवाजी महाराज चौक, समर्थनगर, साईबाबा मंदिर परिसर यांसह अनेक ठिकाणी भटक्या श्वानांनी उपद्रव केला आहे.
२०१९ मध्ये नागरिकांच्या मागणीनुसार तत्कालीन नोव्हेंबर २०१९ मध्ये या गंभीर समस्येवर तोडगा काढत श्वानांचे निर्बिजीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पशुवैद्यकीय अधिकारी आणि तज्ञटीमच्या साहाय्याने शहरातील भटक्या श्वानांना एका जाळीद्वारे पकडून त्यांचे निर्बिजीकरण करण्यात आले होते; मात्र पुन्हा अडीच वर्षांनी शहरात भटक्या श्वानांची दहशत वाढू लागली आहे.
---------------
चौकट
त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी
खेड शहरात कमीत कमी वीस ते पंचवीस भटके श्वान घोळक्याने शहरत फिरत असतात. शाळकरी मुले आणि ज्येष्ठ नागरिक, महिला यामुळे भयभीत आहेत. वेगवेगळ्या टोळ्यांनी फिरणारे हे श्वान आपसात भांडण करू लागले की, रस्त्यावरून चालणारे व दुचाकीस्वार यांच्या मनात धस होते. नगर पालिका प्रशासनाने त्वरित या भटक्या श्वानांचा बंदोबस्त करण्यासाठी पाऊल उचलले पाहिजे, अशी प्रतिक्रिया शहरातील नागरिक अभिजित शिरगांवकर यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y96333 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..