सावंतवाडीत शिवसेनेकडून निरीक्षक मेंगडेंना शुभेच्छा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सावंतवाडीत शिवसेनेकडून निरीक्षक मेंगडेंना शुभेच्छा
सावंतवाडीत शिवसेनेकडून निरीक्षक मेंगडेंना शुभेच्छा

सावंतवाडीत शिवसेनेकडून निरीक्षक मेंगडेंना शुभेच्छा

sakal_logo
By

swt156.jpg
50276
सावंतवाडी : पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांना कल्पवृक्ष भेट देताना रुपेश राऊळ यांच्यासह पदाधिकारी.

सावंतवाडीत शिवसेनेकडून
निरीक्षक मेंगडेंना शुभेच्छा
सावंतवाडीः शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी आज सावंतवाडीचे नवनिर्वाचित पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांची भेट घेत त्यांना कल्पवृक्ष भेट देऊन शुभेच्छा दिल्या. सावंतवाडी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेल्या चोऱ्या व अवैध धंद्यांना वेळीच आवर घालण्याची मागणी यावेळी पदाधिकाऱ्यांनी केली. यावेळी महिला तालुकाप्रमुख अपर्णा कोठावळे, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, उपजिल्हा संघटक शब्बीर मणियार, प्रशांत कोठावळे, गुणाजी गावडे, विनोद ठाकूर, सुनील गावडे, राजू शेटकर, अजित सांगेलकर आदी उपस्थित होते. यावेळी झालेल्या चर्चेत तालुकाप्रमुख राऊळ यांनी मेंगडे यांचे लक्ष वेधताना शहरात अलीकडे चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. तालुक्यातील श्रद्धास्थान असलेल्या सोनुर्ली माऊली मंदिरातही चोरी करण्याचे धाडस चोरट्यांनी केले असून अद्यापपर्यंत चोरट्यांना जेरबंद करण्यात पोलिस यंत्रणेला अपयश आले आहेत, असे सांगितले. रात्रीच्या वेळी पेट्रोलिंग वाढवा तसेच अनधिकृत धंद्याबाबतही कठोर निर्णय घेऊन आळा घालण्याबाबत उपायोजना राबवा, अशी मागणी केली.
...............
swt1510.jpg
50268
सावंतवाडीः विज्ञान प्रदर्शनातील विविध स्पर्धेतील विजेते स्पर्धक.

सेंट्रल स्कूलचे विज्ञान प्रदर्शनात यश
सावंतवाडीः येथे आयोजित ४९ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात येथील सेंट्रल इंग्लिश स्कूलने लक्षवेधी कामगिरी करत विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश प्राप्त केले. पंचायत समिती सावंतवाडी शिक्षण विभाग आयोजित विज्ञान प्रदर्शन २०२१-२२ चे आयोजन सेंट्रल इंग्लिश स्कूलमध्ये करण्यात आले होते. यात विद्यालयाने उल्लेखनीय यश प्राप्त केले. शिक्षक प्रतिकृती माध्यमिक विभागात सेंट्रल इंग्लिश स्कूलच्या विज्ञान शिक्षिका शीतल मोरजकर यांनी प्रथम, विद्यार्थी प्रतिकृती माध्यमिक विभागात आमना गवंडी हिने द्वितीय, तर विज्ञान नाट्यमहोत्सवात जीवनमानाचा दर्जा उंचावण्यासाठी तंत्रज्ञानाचे नवकल्पन-संशोधन या विषयावर आधारीत नाटिकेला तृतीय क्रमांक प्राप्त झाला. सावंतवाडी मर्कझी जमात, मुंबई संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रशालेचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कौतुकाची थाप देणाऱ्या प्रत्येकाचे संस्था व प्रशालेने आभार मानले.
................

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y96340 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..