कुडाळात बुधवारी स्वस्थ बालक स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुडाळात बुधवारी स्वस्थ बालक स्पर्धा
कुडाळात बुधवारी स्वस्थ बालक स्पर्धा

कुडाळात बुधवारी स्वस्थ बालक स्पर्धा

sakal_logo
By

swt१५७.jpg
50277
पणदूर ः बीट क्रमांक २ अंतर्गत कार्यक्षेत्रात गणेशोत्सवात पोषण फुगडी सादर करण्यात आली.

कुडाळात बुधवारी स्वस्थ बालक स्पर्धा
गीता पाटकर-पईः पोषण महिन्यांतर्गत अंगणवाड्यांमध्ये उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १५ ः तालुक्यात महिला व बालविकास विभागांतर्गत चालू सप्टेंबर महिना राष्ट्रीय पोषण महिना म्हणून राबविला जात आहे. या पोषण महिन्यांतर्गत सर्व अंगणवाड्यांमध्ये विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. बुधवारी (ता. २१) सर्व अंगणवाडीत स्वस्थ बालक-बालिका स्पर्धेचे आयोजन केले आहे, अशी माहिती कुडाळ तालुका बालविकास प्रकल्प अधिकारी गीता पाटकर-पई यांनी दिली.
समाजामध्ये जागृती घडवून आणण्याकरिता पोषण अभियानांतर्गत शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत दरवर्षी पोषण महिना व पोषण पंधरवडा साजरा करण्यात येतो. महिला व बालकांच्या आरोग्य व पोषण विषयक स्थितीमध्ये सुधारणा घडवून आणण्याकरिता जागृती हा घटक महत्त्वपूर्ण ठरतो. सप्टेंबर महिना राष्ट्रीय पोषण महिना म्हणून साजरा करण्याचे निर्देळ केंद्राने दिले असून या कार्यक्रमात लोकांचा सक्रिय सहभाग आण्याकरिता विविध उपक्रमांचे नियोजन करण्याचे सूचित केलेले आहे. या उपक्रमाचे हे पाचवे वर्ष आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र १ ला ग्रामपंचायत स्तरावर या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. अंगणवाडी स्तरावर गणेश चतुर्थी उत्सवाचे औचित्य साधून अंगणवाडी सेविकांनी कुडाळ तालुक्यासह जिल्हाभरात विविध उपक्रम राबविले. यात पोषण फुगड्या, पोषणयुक्त आहार मार्गदर्शन, गृहभेटी, आरोग्य विभागामार्फत मुलांची आरोग्य तपासणी, अॅनेमिया कॅम्प, महिला मेळावे, किशोरी मेळावे, पोषण रॅली, प्रभात फेरी, परसबाग भेट व मार्गदर्शन असे विविध उपक्रम महिला व बाल विकास विभागाच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत जिल्हाभर राबविले जात आहेत, अशी माहिती पाटकर यांनी दिली.
कुडाळ तालुक्यातील पणदूर बीट अंतर्गत अंगणवाडी बांबुळी कार्यक्षेत्रात पोषण अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात आले. यात परसबाग मार्गदर्शन हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी गरोदर माता, स्तनदा माता, बालके व कुटुंबातील इतर सदस्य यांना परसबागेचे महत्त्व, परसबागेत कोणकोणत्या भाज्या लावाव्यात, त्यांची लागवड कशी करावी याबद्दल माहिती दिली. तसेच बालकांच्या वाढीसाठी परसबाग कशाप्रकारे महत्त्वाची आहे, हे पटवून देण्यात आले. जर मोठी जागा उपलब्ध नसेल, तर अत्यंत कमी जागेत भाजीपाला लागवड कशी करावी, याबद्दलही मार्गदर्शन करण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y96341 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..