rat1517.txt | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rat1517.txt
rat1517.txt

rat1517.txt

sakal_logo
By

धोबी महासंघ राष्ट्रीय सदस्यपदी संतोष शिंदे
खेड ः अखिल भारतीय धोबी महासंघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यपदी येथील संतोष शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष कैलास कनोजिया यांनी तसे नियुक्तीपत्र दिले आहे. धोबी महासंघाची संघटना बळकट करण्यासाठी दिलेल्या योगदानाची दखल घेत ही निवड करण्यात आली. ते संत गाडगेबाबा परिट समाज संघटनेचे येथील अध्यक्षही होते. अध्यक्षपदाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवण्यावर भरही दिला.

खेड राधाकृष्ण पतसंस्थेची १८ ला सभा
खेड ः खेड राधाकृष्ण नागरी सहकारी पतसंस्थेची २१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा १८ सप्टेंबरला सकाळी ११ वाजता गवळी समाजाच्या महाराष्ट्रीय यादव चॅरिटी शाखेच्या श्रीमान द. ग. तटकरे सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. या सभेत आर्थिक वर्षांची आर्थिक पत्रके स्वीकृत करणे, लेखापरीक्षण अहवाल स्वीकृत करणे, नफावाटणीस मंजुरी देणे, अंदाजपत्रकापेक्षा जास्त झालेल्या खर्चास मंजुरी देणे आदी विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. सभासदांनी सभेस बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी रमाकांत पाटील यांनी केले आहे.
-------------

पाचलमध्ये रविवारी चित्रकला, हस्ताक्षर स्पर्धा
राजापूर ः तालुक्यातील पाचलमधील समाजसेवक (कै.) ज्ञानदेव म. नारकर यांच्या स्मृतीदिनानिमित्ताने नारकर वाचनालयातर्फे येत्या रविवारी (ता. १८) चित्रकला व हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धा पाचवी ते सातवी पहिला गट व आठवी ते दहावी दुसरा गट अशा दोन गटांमध्ये होणार आहेत. चित्रकला स्पर्धेसाठी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, पर्यावरण, माझा आवडता खेळ असे तीन विषय देण्यात आले आहेत. हस्ताक्षर स्पर्धेसाठी एक परिच्छेद देण्यात येणार आहे. स्पर्धा रविवारी सकाळी ९ वाजता पाचल येथील सरस्वती विद्यामंदिरच्या सभागृहामध्ये घेण्यात येणार आहेत. स्पर्धेनंतर लगेचच स्मृतिदिन कार्यक्रम व बक्षीस समारंभ होईल. उच्छुकांनी चित्रकलेसाठी लागणारे साहित्य स्वतः घेऊन यायचे आहे. नावनोंदणीची शेवटची तारीख १६ सप्टेंबर आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y96348 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..