रत्नागिरी- कार्यालयीन कामकाजामध्‍ये हिंदीचा प्रयोग वाढवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- कार्यालयीन कामकाजामध्‍ये हिंदीचा प्रयोग वाढवा
रत्नागिरी- कार्यालयीन कामकाजामध्‍ये हिंदीचा प्रयोग वाढवा

रत्नागिरी- कार्यालयीन कामकाजामध्‍ये हिंदीचा प्रयोग वाढवा

sakal_logo
By

फोटो ओळी
-rat१५p२४.jpg- KOP२२L५०३०९ रत्नागिरी ः बॅंक ऑफ इंडियामध्ये हिंदी दिन कार्यक्रमात संदेश वाचताना राजेंद्र काळे. सोबत रमेश गायकवाड.
---------------
कार्यालयीन कामकाजात
हिंदीचा वापर वाढवा
राजेंद्र काळे ; बँक ऑफ इंडियात हिंदी दिन
रत्नागिरी, ता. १५ ः हिंदी ही एक सरळ व साधी भाषा आहे, जिच्‍यामुळे आपण जनतेशी संपर्क ठेवू शकतो. व्‍यवसायवृद्धीसाठी जनतेच्‍या भाषेचा वापर करणे आवश्‍यक आहे. संपर्क भाषेच्‍या स्‍वरूपात हिंदीला स्वीकारून कार्यालयीन कामकाजामध्‍ये हिंदीचा प्रयोग वाढवावा व राजभाषा हिंदीचा प्रचारप्रसार करावा, असे आवाहन बँक ऑफ इंडियाच्या रत्‍नागिरी विभागाचे उपविभागीय प्रमुख राजेंद्र काळे यांनी केले.
बॅंक ऑफ इंडिया विभागीय कार्यालयामध्‍ये हिंदी दिवस मोठ्या उत्‍साहाने साजरा केला. त्या वेळी ते बोलत होते. बँक ऑफ इंडिया रत्‍नागिरी विभागीय कार्यालयाद्वारे १४ सप्‍टेंबर ते १४ ऑक्टोबर असा एक महिना हिंदी मास साजरा केला जाणार आहे. या दरम्‍यान सर्व शाखांमध्‍ये हिंदीचा प्रचार प्रसारासाठी कार्य केले जाते. हिंदीमधून जास्‍तीत जास्‍त बँकेचे अंतर्गत कामकाज केले जाते. यावर्षीही विभागीय कार्यालय तथा सर्व शाखांतील कर्मचाऱ्यांकरिता विविध हिंदी स्‍पर्धांचे आयोजन केले आहे. बँकेचे अध्यक्ष ए. के. दास यांच्याकडून हिंदी दिवसानिमित्‍त प्राप्‍त संदेशांचे वाचन केले गेले. सूत्रसंचालन हिंदी वरिष्ठ अधिकारी रमेश गायकवाड यांनी केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y96401 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..