खेड-खेड कर्मचारी वसाहत परिसरात अनधिकृत खोके | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खेड-खेड कर्मचारी वसाहत परिसरात अनधिकृत खोके
खेड-खेड कर्मचारी वसाहत परिसरात अनधिकृत खोके

खेड-खेड कर्मचारी वसाहत परिसरात अनधिकृत खोके

sakal_logo
By

पान २ मेन)

फोटो ओळी
-rat१५p२६.jpg ःKOP२२L५०३१० खेड ः शहरातील समर्थनगर येथे पालिकेच्या कर्मचारी वसाहत परिसरात उभारण्यात आलेले खोके.

खेड कर्मचारी वसाहतीजवळ अनधिकृत खोके
पालिकेकडे कारवाईची पाटणे यांची मागणी ; अतिक्रमणामुळे वसाहतीला धोका
खेड, ता. १५ ः खेड नगरपालिकेच्या कर्मचारी वसाहतींमध्ये नव्याने अनधिकृत खोके उभारून संपूर्ण वसाहतीस धोका होईल, अशी परिस्थिती निर्माण केली जाते आहे. त्याकडे तातडीने लक्ष देऊन हे खोके हटवावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शिरीष पाटणे यांनी पालिकेकडे निवेदन देऊन केली आहे. या प्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन पालिकेचे मुख्याधिकारी प्रमोद ढोरजकर यांनी दिले आहे.
खेड शहरात पालिकेच्या जागेवर अतिक्रमण करून व्यावसायिक खोके उभारणी करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. या प्रकरणी पाटणे यांनी पालिकेला निवेदन दिले आहे. शहरातील अनधिकृत खोक्याकडे लक्ष घालून ते खोके उठवणे गरजेचे आहे. खेड सिटी सर्व्हे नं. २५३२ ते २५४९ या भूमापन नंबरमध्ये समाविष्ट वसाहत ही पालिकेची कर्मचारी वसाहत आहे. कर्मचारी वसाहत समर्थनगर साईमंदिरजवळ असून या वसाहतीतील ९ इमारती असून त्यातील एक पडीक आहे. १७ कुटुंबांची व्यवस्था असून त्याच्या पूर्वेकडील भागात जो मुख्य रस्ता जगबुडीकडे जातो त्याला लागून पूर्वी दोन खोकेवजा गाळे होते. आता ६ गाळ्यांची व्यवस्था करून ते कोणासाठी पालिका देणार, याचा उलगडा झालेला नाही. मर्जीतील कोणाला देण्यासाठी ही जागा आहे काय, असा प्रश्न पाटणे यांनी या निवेदनाद्वारे पालिकेला विचारला आहे.
ज. शि. पाटणे यांच्या नगरपालिका कारकिर्दीत ३६ गुंठे जागा १९५५ च्या सुमारास ३ हजार ६०० रुपये खर्च करून ही जागा खरेदी करून कर्मचारी वसाहत १९६०-६१ मध्ये पूर्ण करून घेण्यात आली आहे. ज्या व्यक्तींनी त्यासाठी योगदान दिले त्या व्यक्तींचा हा अपमान असून हे बेकायदेशीर गाळे काढण्यात यावेत. तसेच या जागेमध्ये भविष्यात नगर पालिकेस काही मोठे बांधकाम प्रोजेक्ट करायचे असल्यास ते अडचणींचे ठरणार आहेत. आजसुद्धा या गाळ्यांमुळे वसाहतीमध्ये जरूर पडल्यास एखादे मोठे वाहन आणणेदेखील जमणार नाही. त्यामुळे हे गाळे ताबडतोब हटवावेत. तसेच या वसाहतीच्या पश्चिमेला एका लगतच्या हद्ददाराने जागेत १९ ते २० फूट आत येऊन अतिक्रमण केले आहे. पालिकेने हे अतिक्रमण हटवून भूखंड मोकळा करावा.
-------
चौकट
शहरात सर्वत्रच अतिक्रमणे

खेड नगर पालिका वाचनालय, मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्रासमोरदेखील अनेक गाळे टाकण्यात आले असून वाचनालयाची जागा संपूर्णपणे व्यापून टाकले आहेत. अन्य अनेक ठिकाणीसुद्धा अनधिकृत खोके आहेत त्यावर योग्य ती कारवाई करावी, अशी अपेक्षा पाटणे यांनी निवेदनातून व्यक्त केली आहे.
-------------
चौकट
खोक्यांचे सर्व्हेक्षण करणार ः मुख्याधिकारी
खेड शहरातील समर्थनगर येथील पालिकेच्या कर्मचारी वसाहत परिसरात अनधिकृत खोके उभे राहिले असल्याची तक्रार आमच्याकडे प्राप्त झाली आहे. शहरातील काही भागातून अशा तक्रारी येत असून आम्ही पलिकेमार्फत लवकरच सर्वच खोक्यांचे सर्व्हेक्षण करून पुढील कारवाई करणार आहोत, अशी माहिती मुख्य अधिकारी प्रमोद ढोरजकर यांनी ''सकाळ'' सोबत बोलताना दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y96403 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..