रत्नागिरी-निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-निधन
रत्नागिरी-निधन

रत्नागिरी-निधन

sakal_logo
By

कवी यशवंत कदम यांचे निधन
रत्नागिरी : तालुक्यातील निवेंडी वरची बौद्धवाडी येथील कवी, गायक, फुले-शाहू-आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते यशवंत तुकाराम कदम (वय ७२) मुंबई विरार येथे निधन झाले. मुंबईतही त्यांनी गायनकला जोपासली. त्यांनी लिहिलेली गाणी जलशाच्या माध्यमातून रत्नागिरी-संगमेश्वर तालुक्यात गायली जातात. थेट मनाला भिडणारी क्रांतिकारक काव्यरचना त्यांनी साकारली. त्यांच्या मागे पत्नी, मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. निवेंडी बौद्धजन पंचायत गावशाखेचे अध्यक्ष चंद्रकांत कदम, मोहन कदम यांनी शाखेच्यावतीने शोक व्यक्त केला. यशवंत कदम यांची शोकसभा रविवारी (ता. १८) सकाळी ११ वा. मुंबई विरारला होणार आहे.


फोटो ओळी
-rat१५p३०.jpg- KOP२२L५०३३३सुरेश माणगावकर
---------
प्रा. सुरेश माणगावकरांना श्रद्धांजली

रत्नागिरी : गोगटे- जोगळेकर महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्र विभागातील माजी प्रा. सुरेश माणगावकर यांचे निधन झाले. महाविद्यालयाच्यावतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. प्रा. माणगावकर गोगटे महाविद्यालयात भौतिकशास्त्र विभागात १९७२ ते २००३ या कालावधीत कार्यरत होते. राधाबाई शेट्ये सभागृहात झालेल्या शोकसभेत भौतिकशास्त्र विभागप्रमुख डॉ. महेश बेळेकर यांनी प्रा. माणगावकर यांच्या व्यक्तिमत्वातील विविध पैलूंना उजाळा दिला. प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी त्यांच्या शोकसंदेशात प्रा. माणगावकर यांनी महाविद्यालय प्रशासनात पार पडलेल्या विविध जबाबदाऱ्यांविषयी माहिती सांगितली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y96415 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..