खेड-अनंत चतुर्दशीपासून विजयादशमीपर्यंत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खेड-अनंत चतुर्दशीपासून विजयादशमीपर्यंत
खेड-अनंत चतुर्दशीपासून विजयादशमीपर्यंत

खेड-अनंत चतुर्दशीपासून विजयादशमीपर्यंत

sakal_logo
By

फोटो ओळी
-rat१५p१७.jpg ः KOP२२L५०२६७ खेड तालुक्यातील मुरडे येथील आंबेडेवाडी येथे यावर्षी गणेशोत्सवात बसवण्यात आलेली कालियामर्दन स्वरूपातील गणरायाची बालमूर्ती.
----------

अनंत चतुर्दशीपासून विजयादशमीपर्यंत चालणारा गणेशोत्सव
मुरडेमधील वेगळा उत्सव ; बाप्पाची पंचक्रोशीसह पुण्या-मुंबईत ख्याती

खेड, ता. १५ ः अनंत चतुर्दशीला बाप्पा निरोप घेतात आणि गणेशोत्सवाची सांगता होते. परंतु तालुक्यातील मुरडे-आंबेडेवाडी येथे मात्र त्या दिवशी गणरायाचे आगमन होते. दसरा म्हणजेच विजयादशमीच्या दिवशी वाजतगाजत या बाप्पाला निरोप दिला जातो. नवसाला पावणार्‍या या बाप्पांची पंचक्रोशीसह पुण्या-मुंबईतसुद्धा ख्याती आहे. मुरडे-आंबेडेवाडीत हा अनोखा उत्सव साजरा केला जातो.
या आगळ्यावेगळ्या गणेशोत्सवांची सुरवात सन १९९७ ला करण्यात आली. आज तब्बल २५ वर्षे या ठिकाणी अखंडपणे गणरायाची आराधना सुरू आहे. सन १९९७ ला मुरडे-आंबेडेवाडी या ठिकाणी अनंत आंबेडे यांच्या घराच्या अंगणात काही मुले खेळत होती. खेळताखेळता काहींनी मातीचा किल्ला बनवण्यासाठी माती आणली; मात्र किल्ला बनवताना या मातीतून त्या मुलांच्या हातून गणरायच साकारले; परंतु त्या लहानग्यांना त्या गणरायाला रंगछटा देता येत नव्हत्या. त्यानंतर मात्र त्यातील काही मुलांनी वाडीतच असलेल्या सहदेव आंबेडे यांच्या गणेशमूर्ती शाळेत धाव घेतली व त्यांना ही गोष्ट सांगितली. त्या वेळी आंबेडे यांच्या मातोश्री गंगाबाई आंबेडे यांनी या मुलांना मूर्तिशाळेतील एक गणरायाची मूर्ती भेट दिली. त्या दिवशी अनंत चतुदर्शी होती. त्यानंतर मात्र त्या सर्वच मुलांनी एकत्र येत अनंत आंबेडे यांच्या अंगणात ही मूर्ती विराजमान करून गणेशोत्सवास सुरवात केली. त्यानंतर अनेक वर्षे हा गणेशोत्सव आंबेडे यांच्या अंगणात सुरू होता; परंतु २००४ ला आंबेडे यांच्या घरासमोर गणपतीचे मंदिर बांधण्यात आले. त्यामुळे त्यानंतर या मंदिरात सद्यःस्थितीत हा गणेशोत्सव सुरू आहे. या संपूर्ण वाडीमध्ये २४ घरे असून बहुतांश लोक हे कामानिमित्त मुंबई-पुणे या ठिकाणी वास्तव्यास आहेत. या उत्सवासाठी कोणत्याही प्रकारची देणगी तसेच वर्गणी काढली जात नाही. या ठिकाणी अद्यापही शाडूच्या मातीची मूर्ती बसवली जाते. त्या मूर्तीवर आजही नैसर्गिक रंगाची रंगछटा साकारली जाते. वाडीतील एका मूर्तिशाळेत ही मूर्ती साकारली जाते. त्यासाठी गावातील सर्व मित्रमंडळी एकत्र येत ही मूर्ती बनवतात.
------------
चौकट
गणरायामुळे वाडीला ओळख
या गणरायामुळे आमच्या वाडीला एक वेगळी ओळख मिळाली आहे. संपूर्ण पंचक्रोशीतील लोकांची या बाप्पावर श्रद्धा असून नवसाला पावणारा हाकेला धावणारा, असा आमच्या बाप्पांचा नावलौकिक आहे, अशी प्रतिक्रिया मंडळाचे अध्यक्ष रवींद्र आंबेडे यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y96417 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..