चौकशीसाठीचे बोलावणे पाठविले तारीख उलटल्यावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चौकशीसाठीचे बोलावणे पाठविले तारीख उलटल्यावर
चौकशीसाठीचे बोलावणे पाठविले तारीख उलटल्यावर

चौकशीसाठीचे बोलावणे पाठविले तारीख उलटल्यावर

sakal_logo
By

चौकशीसाठीचे बोलावणे
पाठविले तारीख उलटल्यावर
मालवण पोलिसांचा कारभारः बरेगार यांची तक्रार
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १५ः येथील पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांचा भोंगळ कारभार माहिती अधिकार कार्यकर्ते जयंत बरेगार यांनी उघड केला आहे. कागदपत्रांच्या पाहणीसाठी बोलावण्याबाबत त्यांना पाठविलेले पत्र तब्बल चार दिवस उशिरा आल्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर दप्तर दिरंगाई कायदान्वये कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून माहिती दिली.
त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी कुडाळ पोलिस ठाण्याच्या तत्कालीन पोलिस निरीक्षकांविरोधात माहिती अधिकारात माहिती मागितली होती; परंतु त्यांना असंबध्द माहिती देण्यात आल्यामुळे त्यांनी या विरोधात तक्रार केली होती. उपोषणाची नोटीसही दिली होती. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू होती. दरम्यान, त्यांना ६ तारखेला कागदपत्रांची पाहणी करण्यासाठी बोलावण्यात आले. तशा आशयाचे पत्र ९ तारखेला पोस्ट करण्यात आले; मात्र ते पत्र त्यांना १२ तारखेला मिळाले. हा प्रकार पाठविण्यात आलेल्या पोस्टाच्या तिकिटावरून उघड झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे याप्रकरणी आपली दिशाभूल करण्यासह शासकीय नुकसान करणाऱ्या संबंधित पोलिस कर्मचाऱ्यावर योग्य तो गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y96418 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..