डेगवेत टेम्पो मातीत रुतला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डेगवेत टेम्पो मातीत रुतला
डेगवेत टेम्पो मातीत रुतला

डेगवेत टेम्पो मातीत रुतला

sakal_logo
By

wt1527.jpg
50347
डेगवेः येथे अपघातग्रस्त झालेला टेम्पो.(छायाचित्र ः निलेश मोरजकर)

डेगवेत टेम्पो मातीत रुतला
बांदा ः दोडामार्ग रस्त्यावर डेगवे-बाजारवाडी येथे विलास केसरकर यांच्या दुकानासमोर टेम्पो बाजुपट्टीवरील मातीत रुतला. सुदैवाने मोठा अनर्थ टळला. ही घटना आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली. गेल्या चार दिवसातील हा दुसरा अपघात आहे. सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. या दोन्ही बाजुपट्टी पावसाळ्यात कमकुवत झाल्या असून वारंवार अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अपघात टाळण्यासाठी या बाजुपट्टीचे काम तात्काळ करावे, अशी मागणी स्थानिकातून होत आहे.
---------
भेकुर्लीत वासराचा वाघाकडून फडशा
साटेली भेडशीः भेकुर्ली येथील भैरू गंगाराम झोरे यांच्या वासराचा वाघाने फडशा पाडला. वाघाच्या हल्ल्यात वासरू जागीच गतप्राण झाले. गेल्या काही दिवसांतील ही दुसरी तर सहा महिन्यांतील चौथी घटना म्हणावी लागेल. वनविभागाकडे भेकुर्ली येथील धनगर बांधवांनी पुनर्वसनाची मागणी केली आहे. शिक्षण व पर्यावरण मंत्री दीपक केसरकर यांचीही त्यांनी भेट घेवून वन्यप्राण्याकडून भर दिवसा भर वस्तीत येवून पाळीव जनावरांवर हल्ले करण्याचे, घरात घुसून दहशत माजवण्याचे प्रकार घडत असल्याने सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करण्याची मागणी केली होती; मात्र शासन आणि वन अधिकाऱ्यांनी कानावर हात घेतल्याने तेथील ग्रामस्थांना कानावर जीव मुठीत घेवून दिवस काढावे लागत आहेत. अजून किती बळी वनविभागाला पाहिजे आहेत.शासनाने आता तरी डोळे उघडावे आणि भेकुर्ली येथील धनगर बांधवांचे तत्काळ पुनर्वसन करावे अशी मागणी पुन्हा एकदा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबूराव धुरी यांनी केली आहे.
------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y96433 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..