रत्नागिरी-शेतकर्‍यांचे पीककर्ज सरसकट माफ करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-शेतकर्‍यांचे पीककर्ज सरसकट माफ करा
रत्नागिरी-शेतकर्‍यांचे पीककर्ज सरसकट माफ करा

रत्नागिरी-शेतकर्‍यांचे पीककर्ज सरसकट माफ करा

sakal_logo
By

शेतकऱ्यांचे पीककर्ज सरसकट माफ करा

काजू उत्पादकांचे साकडे ; कृषी, पणनला सूचना

रत्नागिरी, ता. १५ ः शेतकऱ्यांचे पीककर्ज सरसकट माफ करून काजू व्यवसायाबाबत केसरकर समितीच्या अहवालातील तरतुदींचा विचार करावा यासह विविध मागणीसाठी जिल्ह्यातील काजू उत्पादकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साकडे घातले. त्यांनीही सकारात्मक विचार करण्यासाठी कृषी, पणन विभागाला सूचना दिल्या आहेत.
महाराष्ट्रात विशेष करून कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, आजरा, चंदगड या पट्ट्यात काजूचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेणारे शेतकरी आणि प्रक्रिया करणारे कारखाने अस्तित्वात आहेत. या ठिकाणी ७० टक्के शेतकरी हे काजू उत्पादन करतात. सुमारे १८०० कारखानदारानी या ठिकाणी २०-२२ हजार लोकांना रोजगार उपलब्ध केला आहे.
अडचणींवर तोडगा काढण्याकरिता काजू उत्पादकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी काजू उत्पादकांचे प्रश्‍न त्यांच्यापुढे मांडले. नियमित कर्जधारक शेतकऱ्यांचे पीककर्ज सरसकट माफ करावे, काजु व्यवसायाबाबत २०१८ साली केसरकर समितीने तयार केलेल्या अहवालाच्या बाबत विचार केला जावा. त्यासाठी मुख्यमंत्र्यासमवेत कृषि, अर्थ, सहकार, पणन, महसूल या खात्याचे मंत्री आणि संबधित प्रशासन यांची संयुक्त बैठक मिळावी याकरिता विनंती केली. याबाबत पुढील कार्यवाही लवकरात लवकर सुरु करण्यासंदर्भात मुख्यमंत्री शिंदे यांनी संबंधित खात्याला आदेश दिले. शिव स्वराज्य फाऊंडेशन अध्यक्ष प्रताप पवार, रत्नागिरी काजू संघाचे जिल्हाध्यक्ष विवेक बारगीर, राज्य काजू संघाचे संचालक संदेश दळवी, मुकेश देसाई, बाळासाहेब शिंदे, प्रसाद पाटोळे, संभाजी काजरेकर, तौफीक खतीब हे उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y96440 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..