रत्नागिरी ः दोन वर्षात विजेच्या धक्क्याने चौघांचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी ः दोन वर्षात विजेच्या धक्क्याने चौघांचा मृत्यू
रत्नागिरी ः दोन वर्षात विजेच्या धक्क्याने चौघांचा मृत्यू

रत्नागिरी ः दोन वर्षात विजेच्या धक्क्याने चौघांचा मृत्यू

sakal_logo
By

दोन वर्षात विजेच्या धक्क्याने चौघांचा मृत्यू
उपकरणांत दोष ; वीजप्रवाहात वाढ, वारसांना प्रत्येकी ४ लाख
रत्नागिरी, ता. १५ ः विजेचा धक्का बसून मनुष्यहानी होण्याच्या प्रकारामध्ये वाढ झाली आहे. विजेचा धक्काबसल्याने जिल्ह्यात दोन वर्षांमध्ये चारजणांचा मृत्यू झाल्याची नोंद महावितरणकडे झाली आहे. खराब झालेल्या वाहिन्या, वीज उपकरणांतील दोष, वीज उपकरणे हाताळताना निष्काळजीपणा, अशा कारणांचा यामध्ये समावेश आहे.
मृत्यू झालेल्यांच्या वारसांना महावितरणकडून प्रत्येकी ४ लाखांची आर्थिक मदत देण्यात आली आहे.
विद्युत कर्मचारीही अशा प्रकारच्या अपघातातून सुटलेले नाहीत. महावितरण कंपनी असे अपघात टाळण्यासाठी प्रयत्न करत असली तरी, काही दोष राहिल्याने या घटना घडत आहेत.
२०२१ या वर्षभरात नऊ मानवी अपघात झाले असून, दोन अपघातास महावितरण जबाबदार असल्याने प्रत्येकी चार लाखप्रमाणे एकूण आठ लाखांची नुकसान भरपाई देण्यात आली आहे. तपासामध्ये विद्युत निरीक्षकांचा अहवाल ग्राह्य धरला जात आहे. तर २०२२ मध्ये १४ जणांचा मृत्यू झाला आहे. वीज ग्राहक, कर्मचारी यांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्यास व त्यात महावितरणची चूक असेल तर त्याच्या कुटुंबीयांना ४ लाख रु. मदत दिली जाते. या १४ अपघातांमध्ये पाच प्रकरणी महावितरण जबाबदार आहे. संबंधितांना भरपाई देण्यात आली आहे.

चौकट-
दीड वर्षांमध्ये ३६ जनावरांचा मृत्यू
गेल्या दीड वर्षात जिल्ह्यात ३६ जनावरे विजेच्या धक्क्याने मृत्यूमुखी पडले आहेत. त्यांना भरपाई म्हणून आतापर्यंत ५ लाख ८९ हजार भरपाई प्राण्यांच्या मालकांना देण्यात आली आहेत.

कोट-
विजेच्या उपकरणांना ओल्या हाताने हाताळू नयेत. विजेच्या खांबांना, तारेला जनावरे बांधू नये याबाबत वारंवार महावितरणकडून सूचना करूनसुद्धा दुर्लक्ष केले जाते. परिणाम विजेचा धक्का लागून कर्मचारी, मनुष्य, प्राण्याचा मृत्यू झाल्यास महावितरणकडून आर्थिक मदत देण्यात येते.
-नितीन पळसुलेदेसाई, अधीक्षक अभियंता, महावितरण

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y96445 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..