रत्नागिरी- हातखंब्यात निळा दाढीवाल्या राघू पक्ष्याचे दर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- हातखंब्यात निळा दाढीवाल्या राघू पक्ष्याचे दर्शन
रत्नागिरी- हातखंब्यात निळा दाढीवाल्या राघू पक्ष्याचे दर्शन

रत्नागिरी- हातखंब्यात निळा दाढीवाल्या राघू पक्ष्याचे दर्शन

sakal_logo
By

फोटो ओळी
-rat15p27.jpg- 22L50317
रत्नागिरी ः हातखंबा येथे आढळलेला निळा दाढीवाला राघू.


निळ्या दाढीवाल्या राघूचे हातखंब्यात दर्शन
पक्षीनिरीक्षक ओंकार मोघे; तालुक्यात प्रथमच नोंद
रत्नागिरी, ता. १५ ः तालुक्यातील हातखंबा गावामध्ये निळा दाढीवाला राघू या पक्ष्याचे दर्शन झाले. पक्षीनिरीक्षक ओंकार मोघे यांना त्यांच्या घराच्या आजूबाजूला फेरफटका मारताना हा पक्षी आढळून आला असून रत्नागिरी तालुक्यात अभावानेच आढळतो. प्रथमच याची नोंद करण्यात आली. याचे दर्शन झाले आहे. यापूर्वी हा पक्षी राजापूरमध्येही आढळला होता.
ओंकार मोघे पक्षी निरीक्षण करताना त्यांना हा पक्षी आढळल्यानंतर त्यांनी माहिती मिळवली तसेच अन्य पक्षी निरीक्षण करणाऱ्या अभ्यासकांशी संपर्क साधला. त्यानुसार रत्नागिरी तालुक्यात या पक्ष्याची नोंद अद्याप करण्यात आलेली नाही. सर्वसाधारणपणे हिरवट रंग, निळसर रंगाचा गळा आणि थोडा बाक असलेली चोच असे याचे वर्णन करता येईल. इंग्रजीत या पक्ष्याला ब्लू बर्डेड बी इटर (Blue-bearded Bee-eater) असे म्हणतात. ओलसर पानझडी जंगले आणि गर्द सदाहरित वनांमध्ये त्याचा सहवास आढळून येऊ शकतो. विविध प्रकारचे उडणारे कीटक, मधमाशा हे त्याचे प्रमुख खाद्य आहे. हा पक्षी रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर आणि चिपळूण तालुक्यातील घाटमाथा या भागामध्ये यापूर्वी दिसल्याची नोंद आहे; परंतु रत्नागिरी तालुक्यामध्ये हा प्रथमच दिसला असण्याची शक्यता पक्षी अभ्यासकांनी वर्तवली आहे.
निळ्या दाढीचा मधमाशी खाणाऱ्यांची एक प्रजाती आहे, जी भारतीय उपखंडात आणि दक्षिणपूर्व आशियाच्या काही भागात आढळते. त्याच्या घशातील निळी पिसे लांबलचक असतात.

कोट
रत्नागिरी तालुक्यात स्थानिक व स्थलांतरित मिळून सुमारे 400 हून अधिक पक्ष्यांच्या प्रजाती आढळतात. छायाचित्रण, निरीक्षण या माध्यमातून त्यांच्यावर अभ्यास केला जातो. त्यामुळे नवीन पक्षी प्रजाती आढळल्यास एकमेकांमध्ये माहितीची देवाणघेवाण केली जाते.
- सुधीर रिसबूड, पक्षी अभ्यासक

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y96446 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..