वडिलांच्या श्राद्धास जाताना इन्सुलीतील महिलेचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वडिलांच्या श्राद्धास जाताना
इन्सुलीतील महिलेचा मृत्यू
वडिलांच्या श्राद्धास जाताना इन्सुलीतील महिलेचा मृत्यू

वडिलांच्या श्राद्धास जाताना इन्सुलीतील महिलेचा मृत्यू

sakal_logo
By

50393
वडिलांच्या श्राद्धास जाताना
इन्सुलीतील महिलेचा मृत्यू
गोव्यात माहेराजवळ ट्रक-दुचाकी अपघात
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १५ ः मडकईवाडा-वझरी (ता. पेडणे) येथे आज झालेल्या दुचाकी-ट्रक अपघातात इन्सुलीतील महिला ठार झाली. दुर्गाई सुरेश सावंत (वय ५२, रा. इन्सुली) असे त्यांचे नाव आहे. त्या वडिलांच्या श्राद्धासाठी भावासोबत जात होत्या. माहेरापासून अवघ्या ३०० मीटवर ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, आज वडिलांचे श्राद्ध असल्याने दुर्गाई त्यांचा भाऊ सिद्धेश सूर्या सावळ यांच्यासोबत स्कूटर (जीए ०३ जे ४६६८) वरून इन्सुली येथून गोव्याकडे जात होत्या. मागे त्या बसल्या होत्या. मडकईवाडा-वझरी वळणावर धारगळला स्कूटर आली असता ट्रक (जीए ०३ के ९३३०) च्या मागच्या टायरला स्कूटरची धडक बसली. या अपघातात दुर्गाई सावंत यांच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेले. त्या जागीच ठार झाल्या. स्कूटरचालक सिद्धेश सुदैवाने बचावले. अपघातापासून त्यांचे माहेरचे घर हाकेच्या अंतरावर होते. मोपा (पेडणे) पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. इन्सुली येथे सायंकाळी शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y96482 Txt Sindhudurg1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..