कोळपेतील तरुणाचा आकस्मिक मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोळपेतील तरुणाचा आकस्मिक मृत्यू
कोळपेतील तरुणाचा आकस्मिक मृत्यू

कोळपेतील तरुणाचा आकस्मिक मृत्यू

sakal_logo
By

swt1535.jpg
50375
श्रीधर कांबळे

कोळपेतील तरुणाचा
आकस्मिक मृत्यू
सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. १५ः कोळपे-बौध्दवाडी येथील श्रीधर धोंडू कांबळे (वय ३२) या तरुणाचा हृद्यविकाराने मृत्यू झाला. हा प्रकार आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास झाला. श्रीधर हा कोळपे-बौध्दवाडी येथील रहिवासी आहे. आज सकाळी त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने एका मित्राने दुचाकीवरून उंबर्डे प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. तेथील डॉक्टरांनी त्याला वैभववाडीत नेण्याचा सल्ला दिला. वैभववाडी येथे नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. येथील ग्रामीण रुग्णालयात विच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. शुक्रवारी कोळपे येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. श्रीधर हा तीन वर्षांपूर्वी मुंबईहून गावी आला होता. त्याला गायन, क्रिकेटची आवड होती. त्याच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले, भाऊ असा परिवार आहे.
..........

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y96488 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..