मळगाव-ब्राम्हणआळी शाळेच्या विद्यार्थ्यांचे नेत्रदीपक यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मळगाव-ब्राम्हणआळी शाळेच्या विद्यार्थ्यांचे नेत्रदीपक यश
मळगाव-ब्राम्हणआळी शाळेच्या विद्यार्थ्यांचे नेत्रदीपक यश

मळगाव-ब्राम्हणआळी शाळेच्या विद्यार्थ्यांचे नेत्रदीपक यश

sakal_logo
By

swt१५३७.jpg
५०३८१
गौरी राऊळ
swt१५३८.jpg
५०३८२
दीप्तेश रेडकर
swt१५३९.jpg
५०३८३
विवेक गेळे
swt१५४०.jpg
५०३८४
मानस कोचरेकर

मळगाव-ब्राम्हणआळी शाळेच्या
विद्यार्थ्यांचे नेत्रदीपक यश
सकाळ वृत्तसेवा
साटेली भेडशी, ता. १५ : युवा संदेश प्रतिष्ठानतर्फे (नाटळ सांगवे) २०२१-२२ मध्ये घेण्यात आलेल्या सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेत मळगाव ब्राम्हणआळी शाळेने (ता. सावंतवाडी) घवघवीत यश संपादन केले. परीक्षेला बसलेले सर्व सहा वि‌द्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यातील तीन विद्यार्थी गुणवत्ताधारक व मेडलधारक ठरले. गौरी राऊळ (चौथी) ही २०० पैकी १६६ गुण मिळवून जिल्ह्यात नववी आली. तिने गोल्ड मेडल पटकावले.
विवेक गेळे (चौथी) हा २०० पैकी १५४ गुण मिळवून जिल्ह्यात अठरावा आला. त्याने सिल्व्हर मेडल पटकावले. तर दीप्तेश रेडकर (तिसरी) याने २०० पैकी १५६ गुण मिळवून सिल्व्हर मेडल पटकावले. शिवाय २०२१-२०२२ मध्ये झालेल्या ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेतही शाळेने घवघवीत यश संपादन केले. या परीक्षेत बसलेले सर्व १३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यातील ३ विद्यार्थी गुणवत्ताधारक व मेडलधारक ठरले. मानस कोचरेकर (दुसरी) याने १०० पैकी ८६ गुण मिळवून ब्राँझ मेडल, दीप्तेश रेडकर (तिसरी) याने १०० पैकी ८३ मिळवून ब्राँझ मेडल पटकावले. तसेच विवेक गेळे (चौथी) याने १०० पैकी ७९ गुण मिळवून ब्राँझ मेडल पटकावले. मागील वर्षीही या परीक्षेत विदयार्थ्यांनी आपली चुणूक दाखवली होती. या परीक्षेसाठी मुख्याध्यापक प्रसाद दळवी व उपशिक्षिका अर्चना तळणकर तसेच पालकांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे सावंतवाडीच्या गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके, विस्तार अधिकारी दुर्वा साळगावकर, केंद्रप्रमुख शिवाजी गावीत, शाळा व्यवस्थापन समिती माजी अध्यक्ष राजेंद्र राऊळ, विद्यमान अध्यक्ष जगन्नाथ राणे, उपाध्यक्ष विश्वनाथ राऊळ, निकिता राऊळ, गोविंद राऊळ यांनी अभिनंदन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y96498 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..