प्रकल्‍प बाहेर जाण्यास शिवसेनेचे गद्दार कारणीभूत - खोत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रकल्‍प बाहेर जाण्यास शिवसेनेचे गद्दार कारणीभूत - खोत
प्रकल्‍प बाहेर जाण्यास शिवसेनेचे गद्दार कारणीभूत - खोत

प्रकल्‍प बाहेर जाण्यास शिवसेनेचे गद्दार कारणीभूत - खोत

sakal_logo
By

swt१५३६.jpg
५०३९२
कणकवलीः येथील विजय भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना गौरीशंकर खोत.

प्रकल्‍प बाहेर जाण्यास
शिवसेनेचे गद्दार कारणीभूत
गौरीशंकर खोतः अस्थिर सरकार सत्तेत राहणे घातक
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. १५ः वेदांता फॉक्सकॉन सारखा प्रकल्‍प महाराष्‍ट्राबाहेर जाण्याला शिवसेनेतील ४० गद्दार आमदार देखील कारणीभूत आहेत. एक लाख रोजगार देणारा प्रकल्‍प राज्‍याबाहेर जाणे ही महाराष्‍ट्रासाठी दुर्दैवी बाब आहे. हे अस्थिर सरकार आणि मुख्यमंत्री जेवढे दिवस सत्तेवर असतील तेवढे ते राज्‍यासाठी घातक असेल, अशी टीका शिवसेनेचे उपनेते गौरीशंकर खोत यांनी येथे केली.
येथील विजय भवन येथे श्री.खोत यांनी पत्रकार परिषद घेतली. आमदार वैभव नाईक, सतीश सावंत, संदेश पारकर, शैलेश भोगले, प्रथमेश सावंत आदी उपस्थित होते.
श्री. खोत म्‍हणाले, ‘‘सुमारे दीड लाख कोटी पेक्षा अधिक गुंतवणूक आणि थेट एक लाख रोजगार देणारा प्रकल्‍प राज्‍याच्या भवितव्यासाठी आवश्‍यक होता. विद्यमान मुख्यमंत्र्यांनीही ४ लाख कोटींची गुंतवणूक वेदांतामधून होत असल्‍याची माहिती विधीमंडळात दिली होती. मात्र, एका रात्रीत चक्रे फिरली आणि हा प्रकल्‍प गुजरातला गेला. वेदांता फॉक्सकॉन सारखा प्रकल्‍प राज्‍याबाहेर जाण्याला राज्‍यातील अस्थिर सरकार कारणीभूत आहे. राज्‍यात मंत्र्यांची नेमणूक झालीय. पण, पालकमंत्री अजूनही नियुक्‍त झालेले नाहीत. ज्‍या जिल्ह्यांत मंत्री नाहीत, तेथील जनतेला तर वालीच राहिलेला नाही. अशा स्थितीमुळे राज्‍यातील प्रकल्‍प बाहेर चालले आहेत. वेदांता फॉक्सकॉन बरोबरच औषधे तयार करण्याचा उद्योगही राज्‍याबाहेर गेला आहे.’’
ते पुढे म्हणाले, ‘‘मंत्रिमंडळ असले तरी नियमितपणे कॅबिनेटच्या बैठका होत नाहीत. ठोस धोरण निश्‍चिती होत नाही. नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या जात नाहीत. कुणाचा कुणाला ताळमेळ नसल्‍याने राज्‍यातील संपूर्ण परिस्थिती अस्थिर झाली आहे. यात अनेक प्रकल्‍प राज्‍याबाहेर चालले असून असा अस्थिर सरकारचा मुख्यमंत्री राज्‍याच्या विकासासाठी आणखी घातक ठरणार आहे.’’
----------
चौकट
...तरीही मुंबई तोडू देणार नाही
संयुक्‍त महाराष्‍ट्रासाठी त्‍यावेळी राज्‍यातील सर्व पक्षांनी लढा दिला. १०१ जणांनी बलिदान दिले आणि मुंबईसह महाराष्‍ट्र झाला. आता शिवसेनेतील गद्दार आमदार आणि शिवसेना द्वेष्‍ट्यांच्या पाठबळावर मोदी, शहा मुंबई महाराष्‍ट्रापासून तोडू पाहत आहेत. मात्र, त्‍यांच्या दहा पिढ्या आल्‍या तरी आम्‍ही महाराष्‍ट्रापासून मुंबई वेगळी होऊ देणार नाही, असा इशारा श्री. खोत यांनी यावेळी दिला.
------------
चौकट
राणेंनी बॉडीगार्डशिवाय फिरून दाखवावे
केंद्रातील मंत्र्यांना एका राज्‍याची जबाबदारी दिलीय. तर नारायण राणेंना केवळ एका मतदार संघाची जबाबदारी देऊन भाजपने त्‍यांची पात्रता दाखवून दिलीय. अशा राणेंनी शिवसैनिकांनी फिरून दाखवा, अशा धमक्‍या देऊ नयेत. उलट मुंबईत राणेंनी एक आठवडाभर बॉडीगार्ड शिवाय फिरून दाखवावे, असे आव्हानही खोत यांनी आज दिले.
---------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y96505 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..