विज्ञान प्रदर्शनात तळेरे, कणकवलीची प्रतिकृती प्रथम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विज्ञान प्रदर्शनात तळेरे, कणकवलीची प्रतिकृती प्रथम
विज्ञान प्रदर्शनात तळेरे, कणकवलीची प्रतिकृती प्रथम

विज्ञान प्रदर्शनात तळेरे, कणकवलीची प्रतिकृती प्रथम

sakal_logo
By

kan१६१.jpg
५०४१२
खारेपाटण : येथील विज्ञान प्रदर्शनातील विजेत्‍यांचा सत्‍कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

विज्ञान प्रदर्शनात तळेरे, कणकवलीची प्रतिकृती प्रथम
खारेपाटण, ता. १६ : येथील शेठ न. म. हायस्कूलमध्ये तालुकास्तरीय वैज्ञानिक प्रतिकृतींचे प्रदर्शन झाले. यात वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय तळेरे च्या ‘वाहन प्रतिबंध प्रणाली’ आणि माध्यमिक विद्यामंदिर कणकवलीच्या ‘रोबोटीक मेडिकल असिस्टंट‘ या प्रतिकृतींची प्रथम क्रमांकासाठी निवड करण्यात आली.
या विज्ञान प्रदर्शनाचे बक्षीस वितरण खारेपाटण हायस्कुलच्या कै. चंद्रकांत परिसा रायबागकर सभागृहात झाला. यात खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे, सिंधुदुर्ग जिल्हा व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे अधिकारी रमण पाटील व प्राचार्य डॉ. बी. आर. चौगुले, गटशिक्षण अधिकारी किशोर गवस आदींच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.

विज्ञान प्रतिकृती निकाल असा-
वैज्ञानिक प्रतिकृतीमध्ये उच्च प्राथमिक गट : प्रथम क्रमांक- मनस्वी बारस्कर (वामनराव महाडीक विद्यालय तळेरे) द्वितीय क्रमांक - संतोषी आळवे, (कणकवली शाळा नं.३), तृतीय क्रमांक – आयुष मांगले (शेठ न. म. विद्यालय खारेपाटण )
विज्ञान प्रतिकृती माध्यमिक आणि उच्च माध्यमिक गट : प्रथम क्रमांक – भूमिका चेचरे (विद्यामंदिर हायस्कूल कणकवली), द्वितीय क्रमांक – ऋषिकेश मेस्त्री (कणकवली कॉलेज), तृतीय क्रमांक – वायू प्रदूषण (शेठ न. म. वि. खारेपाटण )
वक्तृत्व स्पर्धा प्राथमिक विभाग : प्रथम क्रमांक – मैत्रेयी आपटे ( विदयामंदिर कनेडी), द्वितीय क्रमांक -प्राजक्ता ठाकुरदेसाई (शेठ न. म. विद्यालय खारेपाटण ), तृतीय क्रमांक- -आर्या कदम(एस.एम.कणकवली )
माध्यमिक विभाग वक्तृत्व स्पर्धा : प्रथम – हिंदवी गायकवाड(ज्युनिअर कॉलेज कनेडी), द्वितीय – स्नेहल तळेकर (ज्युनिअर कॉलेज तळेरे), तृतीय – दिव्यलक्षमी लाड (एस एम कणकवली)
निबंध स्पर्धा प्राथमिक गट : प्रथम – अद्विता पोकळे (कासार्डे माध्य. विद्यालय), द्वितीय -मयुरी तळेकर (माध्यमिक विद्यालय तळेरे), तृतीय -सोहम लोकरे (जि प केंद्र शाळा खारेपाटण नं.१)
माध्यमिक विभाग निबंध स्पर्धा : प्रथम – प्रीती परब (कळसुली इंग्लिश स्कूल), द्वितीय -धनश्री शेट्ये (शेठ न. म. वि. खारेपाटण), तृतीय – कोमल पाताडे (कासार्डे माध्य. विद्यालय कासार्डे)
प्रयोगशाळा सहाय्यक-परिचर उच्च माध्यमिक गट : प्रथम -सहदेव जाधव (नाथ पै प्रबोधिनी करूळ ), माध्यमिक गट (शिक्षक ) – प्रथम – प्रणिता बांबूळकर (माध्य. विद्यालय नाटळ), उच्च प्राथमिक गट (शिक्षक ): प्रथम -सीताराम पारधीये (साळीस्ते नं.१)
विज्ञान मेळावा २०२२-२३ निकाल : प्रथम -सिद्धी कुंभार (एस एम हायस्कूल कणकवली), द्वितीय – मैत्रेय हरकुळकर (विद्यामंदिर कणकवली )तृतीय – आस्था जोईल (न्यू इंग्लिश स्कुल फोंडाघाट )
राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव स्पर्धा २०२२- २३ : प्रथम -सद्गुरू भालचंद्र विद्यालय कणकवली क्र.३), द्वितीय -(एस एम हायस्कूल कणकवली), तृतीय -(विद्यामंदिर माध्य. प्रशाला कणकवली).

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y96576 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..