दोडामार्गसाठी विकास निविदा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दोडामार्गसाठी विकास निविदा
दोडामार्गसाठी विकास निविदा

दोडामार्गसाठी विकास निविदा

sakal_logo
By

दोडामार्गसाठी विकास निविदा
कणकवलीः दोडामार्ग तालुक्यातील कसई - दोडामार्ग नगरपंचायतीकडून कार्यक्षेत्रातील विविध कामांची विकास निविदा जाहीर केली आहे. यामध्ये कसाई - दोडामार्ग कार्यत्रेत्रा मध्ये नवीन मच्छी मार्केट इमारतीचे बांधकाम करण्यासाठी ४१ लाख ८९ हजार २७२ रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच मराठे प्लॉटिंग रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे, गटार बांधकामसाठी २२ लाख ७९ हजार ९७५ रुपयेची तरतूद केली आहे. शिक्षक कॉलनी अंतर्गत रस्ता खडीकरण, डांबरीकरण, गटार बांधकामासाठी १७ लाख ८३ हजार सोळा रुपये निधीची तरतूद केली आहे. ठेकेदाराच्या बिल्लातून सुरक्षा अनामत आठ टक्के कपात केली जाईल. या कामांची मुदत सहा महिन्याची आहे. ही निविदा प्रसिद्ध झाल्यापासून २३ सप्टेंबर पर्यंत भरणा करावी लागणार आहे. ही निविदा २६ सप्टेंबरला सकाळी ११ वाजता खुली करण्यात येणार आहे.
------
हरकुळ खुर्दबाबत आवाहन
कणकवलीः मौजे हरकुळ खुर्द ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील विविध विकास कामांसाठी नोंदणीकृत पुरवठादारांकडून शिल्लबंद दरपत्रक आणि निविदा मागे घेतली आहे. गावातील सार्वजनिक ठिकाणी बैठक व्यवस्था करणे, यासाठी सिमेंट बैठक व्यवस्था पुरवठा तसेच ग्रामपंचायत १५ टक्के निधीतून एलईडी ब्रॅकेट बसवणे, गावातील अंगणवाडीसाठी टेबल, खुर्ची, कार्पेट साहित्य पुरवठा करणे. प्राथमिक शाळांमध्ये टेबल, खुर्च्या, कपाट साहित्य पुरवठा करण्यासाठी निविदा जाहीर केली असून मान्यता प्राप्त ठेकेदारांना २२ सप्टेंबर पर्यंत निविदास सादर करावी लागणार आहे. प्राप्त झालेल्या निविदा २९ सप्टेंबरला अकरा वाजता उघडण्यात येतील. दरपत्रके नामजूर केल्यानंतर संबंधित ठेकेदाराला कोणताही प्रकारचा पत्र व्यवहार केला जाणार नाही. कामाच्या अटी आणि शर्तीची माहिती ग्रामपंचायत कार्यालयात उपलब्ध आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y96610 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..