नवरात्रोत्सव मंडळांकडून दुर्गोत्सवाची तयारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नवरात्रोत्सव मंडळांकडून दुर्गोत्सवाची तयारी
नवरात्रोत्सव मंडळांकडून दुर्गोत्सवाची तयारी

नवरात्रोत्सव मंडळांकडून दुर्गोत्सवाची तयारी

sakal_logo
By

नवरात्रोत्सव मंडळांकडून दुर्गोत्सवाची तयारी
चिपळूण, ता. १६ ः चिपळूण शहरासह तालुक्यात गणेशोत्सवाच्या सांगतेनंतर सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांनी दुर्गोत्सवाची तयारी जोरात सुरू केली आहे. सगळ्याना नवरात्रोत्सवाचे वेध लागले आहेत. ठिकठिकाणी दुर्गामातेची मूर्ती बनवण्याची लगबग युद्धपातळीवर सुरू असून दुर्गेची विविध रूपे साकारू लागली आहेत. २६ सप्टेंबरपासून नवरात्रोत्सवास प्रारंभ होत आहे.
शहरातील पेठमाप आणि तालुक्यातील शिरगाव व अन्य ठिकाणी मूर्तिकारांनी ३ फुटांपासून १४ फुटांपर्यंत मूर्ती बनवण्यास सुरवात केली आहे. गणपतीच्या मूर्तीपेक्षा दुर्गामातेच्या मूर्ती बनवताना जास्त वेळ लागतो. सध्या प्रशासनाने पर्यावरणपूरक मूर्ती तयार करण्याच्या सूचना मूर्तिकारांना दिल्या असल्याने मूर्तिकार शाडू मातीच्या मूर्ती करत असल्याने यावर्षी देवीच्या मूर्तींच्या दरात बर्‍यापैकी वाढ होणार असल्याचे मूर्तिकारांनी सांगितले.
चिपळूण शहरात काविळतळी, मार्कंडी, राहुल गार्डन, गोवळकोट, तालुक्यात खेर्डी, शिरगाव आलोरे, कुंभार्ली, सावर्डे, रामपूर मार्गताम्हणे, दादर, टेरव आणि येथे मोठ्या प्रमाणावर गणेशोत्सवाप्रमाणे नवरात्रोत्सव साजरा केला जातो. बाजारपेठेत दांडिया टिपर्‍या विक्रीसाठी आल्या आहेत. रास दांडियाचे घागरा, चनिया चोली व अन्य विविध प्रकारचे ड्रेस कापड बाजारपेठेत विक्रीसाठी आले आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y96678 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..