लांजा-काजू उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लांजा-काजू उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावणार
लांजा-काजू उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावणार

लांजा-काजू उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावणार

sakal_logo
By

फोटो ओळी
rat१६p६.jpg ः KOP२२L५०४५६लांजा ः रत्नागिरी काजूसंघाच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन काजू उत्पादक शेतकरी आणि व्यावसायिकांच्या प्रश्नांबाबत लक्ष वेधले.
---------
काजू उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावणार
मुख्यमंत्र्यांचे आश्वासन ; रत्नागिरी काजू संघाने घेतली मुंबईत भेट
लांजा, ता. १६ ः जिल्ह्यातील काजू उत्पादक शेतकरी आणि काजू व्यावसायिक यांच्या प्रश्नासंदर्भात रत्नगिरी काजूसंघाचे पदाधिकारी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबई येथे भेट घेतली. काजू उत्पादक शेतकरी आणि व्यावसायिक यांचे प्रश्न लवकरच मार्गी लावू, असे ठोस आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले असल्याची माहिती जिल्हा काजू संघाचे पदाधिकारी प्रताप पवार यांनी दिली.
कोकणातील सिंधुदुर्ग-रत्नागिरी, आजरा, चंदगड या पट्ट्यात काजूचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेणारे शेतकरी आणि प्रक्रिया करणारे कारखाने अस्तित्वात आहेत. या ठिकाणी ७० टक्के शेतकरी हे काजू उत्पादन करतात. सुमारे १८०० कारखानदारांनी या ठिकाणी २०-२२ हजार लोकांना रोजगार उपलब्ध केला आहे. कोरोनाच्या काळात अनेक व्यावसायिक अडचणीत आले. काजूप्रक्रिया रोजगार मंदावला गेला. अनेक छोटे कारखानदार आर्थिक अडचणीत आले. या अडचणींवर तोडगा काढण्याकरिता रत्नागिरी जिल्हा संघाच्या माध्यमातून शिवसाम्राज्य शेतकरी कंपनी-संस्थापक, शिवस्वराज्य फाउंडेशनचे अध्यक्ष प्रताप पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन याबाबत काही धोरणात्मक निर्णय घेऊन त्यावर तोडगा काढण्यासंदर्भात चर्चा करून विनंती केली. यामध्ये नियमित कर्जधारक शेतकऱ्यांचे पीककर्ज सरसकट माफ करावे, काजू व्यवसायाबाबत २०१८ ला केसरकर समितीने तयार केलेल्या अहवालाबाबत विचार केला जावा यासाठी मुख्यमंत्र्यासमवेत कृषी, अर्थ, सहकार, पणन, महसूल या खात्याचे मंत्री आणि संबंधित प्रशासन यांची संयुक्त बैठक मिळावी याकरिता विनंती केली. या वेळी रत्नागिरी काजूसंघाचे जिल्हाध्यक्ष विवेक बारगीर, महाराष्ट्र काजूसंघाचे संचालक संदेश दळवी, सचिव मुकेश देसाई, सल्लागार बाळासाहेब शिंदे, सामाजिक कार्यकर्ते प्रसाद पाटोळे, ओबीसी समाजाचे राज्य कार्यकारी संचालक आणि कोकणी बळीराजा शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष संभाजी काजरेकर, तौफीक खतीब हे उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y96681 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..