चिपळूण ः पंपचालकांकडून एक्स्ट्रा प्रीमियम पेट्रोल ग्राहकांच्या माथी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण  ः पंपचालकांकडून एक्स्ट्रा प्रीमियम पेट्रोल ग्राहकांच्या माथी
चिपळूण ः पंपचालकांकडून एक्स्ट्रा प्रीमियम पेट्रोल ग्राहकांच्या माथी

चिपळूण ः पंपचालकांकडून एक्स्ट्रा प्रीमियम पेट्रोल ग्राहकांच्या माथी

sakal_logo
By

पंपचालकांकडून एक्स्ट्रा प्रीमियम पेट्रोल ग्राहकांच्या माथी


चिपळूणमधील प्रकार ; साधे पेट्रोल संपल्याचे दिले जाते कारण
चिपळूण, ता. १६ ः केंद्र व राज्यशासनाने पेट्रोल, डिझेलवरील कर कमी केल्यानंतर पेट्रोल, डिझेलच्या दरात कपात झाली; मात्र काही पेट्रोलपंप चालकांकडून जादा दराचे पेट्रोल खपवण्यासाठी साधे पेट्रोल शिल्लक असतानाही एक्स्ट्रा प्रीमियम पेट्रोल भरण्यास सांगितले जात आहे. त्यामुळे वाहनधारकांची इच्छा नसूनही त्यांना जादा दराचे पेट्रोल भरावे लागत आहे. पेट्रोलपंपावरील सेवासुविधांचाही अनेक ठिकाणी बोजवारा उडाला आहे.

पेट्रोलपंपावर साधे पेट्रोल शिल्लक असताना पंपावर एक्स्ट्रा प्रीमियम तेल भरण्यास सांगितले जाते. साधे पेट्रोल संपले आहे एवढेच सांगितले जाते. त्यामुळे नाइलाजास्तव ग्राहकाला ज्यादा दराच्या एक्स्ट्रा प्रीमियम तेलाची खरेदी करावी लागते. पेट्रोलपंपावरील एका लेनवर तेलगाडी खाली करण्याच्या नावाखाली ही पेट्रोल विक्री केली जाते. दुसऱ्या बाजूला एक्स्ट्रा प्रीमियमचा खप वाढवण्यासाठी साधे पेट्रोल शिल्लक असतानाही हे पंपचालक साधे पेट्रोल संपले आहे. साध्या आणि एक्स्ट्रा प्रीमियम पेट्रोलमध्ये सहा ते सात रुपयांचा फरक पडतो. साध्या पेट्रोलचा दर १०६ रुपये ७२ पैसे, तर एक्स्ट्रा प्रीमियमचा दर ११२ रुपये ७७ पैसे आहे. त्यामुळे ग्राहकाला गरज नसतानाही एक्स्ट्रा प्रीमियम तेल घ्यावे लागते. एक्स्ट्रा प्रीमियम तेल ग्राहकांना घेण्यासाठी भाग पाडले जाते. प्रशासनाने अशा पेट्रोल पंपचालकांवर कारवाई करून ग्राहकाला जे तेल हवे आहे तेच द्यावे अन्यथा साधे पेट्रोल संपले असेल तर त्याबाबत प्रशासनाने अचानक तपासणी करून खात्री करावी, अशी मागणी ग्राहकांकडून केली जात आहे.

कोट
चिपळूण शहरात पेट्रोल पंपांची संख्या अधिक आहे. या पेट्रोलपंपावर सुविधांचा अभाव आहे. स्वच्छतागृह अस्वच्छ आहेत. काही ठिकाणी ती कुलूपबंद आहेत. त्यामुळे वाहनधारकांची कुचंबणा होते. अनेक पंपांवर शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध नाही. पाणी पिण्यासाठी ग्लास ठेवला जात नाही. प्लास्टिकचा ग्लास ठेवला जातो. काही ठिकाणी पाणी पिण्यासाठी ठेवलेले भांडे अत्यंत अस्वच्छ असते. त्यामुळे प्रशासनाने तहसीलदार व प्रांताधिकारी यांनी सर्व पेट्रोलपंपांची तपासणी करून संबंधितांवर कारवाई करावी.
- तुषार शिंदे, गाणे, ता. चिपळूण

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y96684 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..